ताज्या घडामोडी

डाॅ. श्री.चन्द्रकांत सावंत सर सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांची MVLA NATIONAL LEVEL TOP TEN AWARD साठी निवड

Spread the love

भारत देशाच्या महनीय व्यक्ती मा. राष्ट्रपती , मा. उपराष्ट्रपती , मान्यवर यांच्या सानिध्यात हस्ते होणार सत्कारासह सन्मान प्रदान.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
आंतरराष्ट्रीय मानांकित डाॅक्टरेट सन्मान प्राप्त डाॅ. श्री. चन्द्रकांत सावंत सर ( आंबोली सिंधुदुर्ग महाराष्ट्र ) DOCTOR OF EDUCATION
DOCTOR OF PHILOSOPHY प्राप्त
सामान्य तत्त्व … ते असामान्य कार्याकडे वाटचाल… सहजतेने…
शैक्षणिक सामाजिक यशस्वितेत मानांकित सन्मानाची भर…
विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , समाजरत्न , जीवनगौरव पुरस्कार प्राप्त डाॅ. श्री.चन्द्रकांत तुकाराम सावंत सर ( आंबोली गावठणवाडी )
श्री देव गांगोबा कृपाक्षेत्रात ओवळीये मुळगाव व आंबोली सारख्या ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक शाळा , आंबोली गावठण येथे चौथी पर्यंतचे शिक्षण , युनियन इंग्लिश स्कूल आंबोली हायस्कूल येथे पाचवी ते दहावी पर्यंतचे चांगल्या प्रकारे यशस्वितेसह मिळालेले शिक्षण तसेच विद्या विकास अध्यापक विद्यालय आजगाव येथे डि.एड शिक्षण, त्यानंतर सहजतेने पुर्ण केलेले बी.ए. , एम.ए. ( English ) , बी.एड. , एम.ए.( शिक्षणशास्त्र ) , डि.एस.एम. , MSCIT यासारखे शिक्षण घेऊन अध्यापन शास्त्र , शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन शास्त्राचा वापर अध्ययन अध्यापन करताना प्रकल्प , नवोपक्रम , कृतिसंशोधन, संशोधन कार्य पूर्ण करत मिळविलेली शैक्षणिक सर्वांगिण यशस्विता.
शाळा , केंद्र , प्रभाग , जिल्हा , विभाग व SCERT स्तरापर्यंत प्रशिक्षक , तज्ज्ञ मार्गदर्शक , निरीक्षक म्हणून केलेले कार्य .
पदवीधर शिक्षक जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. 2 ता. वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग तथा माजी मुख्याध्यापक जि.प सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा , फणसवडे ता. सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 73 शाळांमधील 115 मुलींना दत्तक घेऊन या *प्रत्येक विद्यार्थीनी प्रमाणे जि.प. प्राथमिक , उच्चप्राथमिक साठी 3000 रू व माध्यमिक शाळेतील मुलींसाठी प्रत्येकी 4000 रुपये प्रमाणे कायमस्वरूपी जमा रक्कम करत समाज सहकार्यासाठी कौतुकास्पद कार्याद्वारे शैक्षणिक सामाजिक कार्याची सुरूवात दुर्गम भागात करत सर्वांगिण कार्यातून जि.प.सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे शाळेचा व गावाचा तसेच जागतिक आदर्श शिक्षक सन्मान प्राप्त करत गावांच्या शैक्षणिक सामाजिक यशस्वितेत सन्मानाचा तुरा खोवत कार्य तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शतकपार दत्तक विद्यार्थीनी घेत शैक्षणिक समाजकार्य करणारे आदर्श शिक्षक समाजरत्न विद्यारत्न सन्मान प्राप्त डाॅ. चन्द्रकांत तुकाराम सावंत सर आंबोली गावठणवाडी ( पदवीधर शिक्षक , जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. 2 ता. वेंगुर्ला तसेच माजी मुख्याध्यापक जि. प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे ता. सावंतवाडी )
राष्ट्रीय शिक्षणरत्न , राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक , राष्ट्रीय समाज सेवा रत्न अवार्ड 2021 , राष्ट्रीयरत्न जीवनगौरव नागरी पुरस्कार, भारत भूषण सम्मान 2021, Honorary Doctorate 2021 ( Doctor of Education), Global Ideal Teacher of the Year, Global Teacher Award Educationist , Ideal Inspiring Excellent Teacher Award , Indian Glory Awards – Best National Teacher of the Year , Inspiring Yuva Award 2021 , Education Icon Awards 2021 , Best Citizen of India , Global Best Teacher Award 2021 , राष्ट्रीय रत्न जीवनगौरव नागरी पुरस्कार 2021 , महाराष्ट्र गोवा एकता शैक्षणिक पुरस्कार 2021 , क्रांतिबा – क्रांतिज्योती शैक्षणिक सेवारत्न राष्ट्रीय पुरस्कार 2021, समाजगौरव , समाजभूषण सन्मानसहित जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार , जागतिक शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार 2019 , गुरूजन गौरव राष्ट्रीय अवॉर्ड 2020 , राष्ट्रीय बेस्ट टीचर अवॉर्ड 2021 , महात्मा ज्योतीरीव फुले राष्ट्रीय समाजरत्न नागरी पुरस्कार 2021 , Nation Builder Award, राष्ट्रीय रत्न अवार्ड 2021 , राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान 2021 , श्री गुरू विद्यादाता जीवनगौरव पुरस्कार 2021 , Glory Of Globe Teacher Achiever Award 2021 , International Teachers Excellence Award 2021 , Education Excellence Award 2021 , Global Teachers Excellence Award 2021 , Asia Pride Awards 2021, जागतिक, राष्ट्रीय , राज्य स्तर ते गाव , शाळा स्तरापर्यंत विविध आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , समाजरत्न सन्मान प्राप्त करत तसेच फणसवडेतील महिला बचत गटांचे मार्गदर्शक व्यवस्थापक कार्य करत महिला सदस्यांची कर्जरक्कम 5,35,525/- ( पाच लाख पस्तीस हजार पाचशे पंचवीस रुपए मात्र) रकमेतून कर्जमुक्त करीत दीपावली भेट देत आपुलकीयुक्त समाजकार्य यशस्विता
आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जि. प. प्राथमिक , उच्चप्राथमिक 68 शाळांमधील 90 विद्यार्थीनी व माघ्यमिक 5 हायस्कूल मधील 25 विद्यार्थीनी मिळून एकत्रित 73 शाळांमधील 115 विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेताना 3,62,00/- ( तीन लाख बासष्ट हजार रुपये मात्र ) रक्कम कायमस्वरूपी देणगी सहकार्य.
शैक्षणिक सामाजिक समाजकार्याची दखल घेऊन आदरणीय मा. श्री. कृष्णाजी जगदाळे सर व निवड समिती MVLA TRUST यांनी MVLA National Level Top Ten Star Guru Sanman Lifetime Achievement Award 2022 साठी देशभरातून निवडलेल्या फक्त दहा सन्मानमुर्ती मान्यवरात मा. डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांची निवड करण्यात आलेली आहे. सदर सन्मान मा. राष्ट्रपती , मा. उपराष्ट्रपती तसेच देशातील मान्यवरांसह उपस्थितीत दिल्ली येथे रविवार दि. 13 / 02 /2022 रोजी डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर सिंधुदुर्ग यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हार्दिक हार्दिक अभिनंदन..
भावी यशस्वी शैक्षणिक सामाजिक समाजकार्य वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!