ताज्या घडामोडी

किरण गित्ते IAS अकॅडमी द्वारे कल्पना मुंडे यांचा भव्य सत्कार

Spread the love

परळी ( प्रतिनिधी) किरण गित्ते IAS अकॅडमीची विद्यार्थिनी कल्पना वसंत मुंडे रा. कन्हेरवाडी यांची एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या 2021 च्या परीक्षेत राज्य कर निरिक्षक (STI) पदावर निवड झाली या निमित्ताने तिचा भव्य सत्कार समारंभ किरण गित्ते IAS अकॅडमी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळीच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ विजय रांदड आणि दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे प्राचार्य विठ्ठल तुपे सर उपसथित होते.
आपल्या मनोगतातून नम्रता चाटे मॅडम म्हणाल्या विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीने स्पर्धा परिक्षेसाठी पुण्यासारखे अभ्यासाचे वातावरण परळी शहरात निर्माण केले आहे. याचा फायदा परळी परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होताना दिसतो आहे. किरण गित्ते सर आणि उषा गित्ते मॅडम यांनी आपल्यासाठी खूप मोठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिली आहे. कल्पना मुंडेंनी मिळालेले यश हे अंतिम न समजतां अजून मोठ्या पोस्ट साठी प्रयत्न करावेत असे उपविभाग अधिकारी नम्रता चाटे मॅडम म्हणाल्या. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कल्पना मुंडे यांनी आपल्या मनोगतात म्हणाल्या मी जे यश संपादन केले आहे त्यामध्ये किरण गित्ते IAS अकॅडमी चे खूप मोठे योगदान आहे. २०१७ वर्षीं एका पोलिस अधिकाऱ्याच्या सत्कार समारंभाने प्रेरीत होवून मी येथे अभ्यास सुरू केला. ॲकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली मी अभ्यास करून अगोदर टॅक्स असिस्टंट आणि आता सेल्स टॅक्स इन्सपेक्टर ची परिक्षा पास करण्याचं यश प्राप्त केलं. आज माझा अकॅडमीमध्ये सत्कार झाला तो माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. मागील वर्षी मी ३ महिण्यासाठी पुण्याला गेले होते. परंतु तिथे खुप खर्च होत असल्याने परळीला अकॅडमीला परत आले. इथे पुण्यासारख्याच अभ्यासाच्या सोयी उपलब्ध असल्याने आपण सतत प्रयत्न करावेत असे अवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. मी पदवी दरम्यान एमपीएससी परिक्षेचा विचार करून अभ्यास केल्याचाही फायदा झाला असे कल्पना मुंडे म्हणाल्या.

श्री.किरण गित्ते साहेब IAS सचिव, नगर विकास,सार्वजनिक बांधकाम, पर्यटन विभाग, त्रिपुरा सरकार व विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटी च्या अध्यक्षा सौ. उषा किरण गित्ते यांनी कल्पना मुंडेंना व्हिडीओ कॅान्फरन्सींग द्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.सत्कार कार्यक्रमात आभार प्रदर्शन श्री. विठ्ठल तुपे सर यांनी केले तर सूत्रंचालन महेश मुंडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!