ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्यव्यापी नाशिक अधिवेशनात प्रशांत जामोदे यांची राज्य कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस एम पाटील

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे १४ वे राज्यव्यापी सुवर्ण महोत्सवी अधिवेशन नाशिक येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात दिनांक १९.२० नोव्हेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष माननीय कॉ. सुभाष जी लांबा, खा. उमेश पाटील (जळगाव), खा. हेमंत गोडसे (नाशिक), आ.सीमाताई हिरे (नाशिक), महासंघाचे राज्य उमेशचंद्र चिलबुले साहेब, ग्रामसेवक युनियन चे , सचिव सूचित घरत महासंघ सचिव संजय महाळणकर, मानद अध्यक्ष एन. एन. ठाकूर,प्रशांत जामोदे

विविध जिल्ह्यातील अध्यक्ष, सचिव व राज्य पदाधिकारी संवरग संघटनेचे राज्य अध्यक्ष सरचिटणीस यांचे उपस्थितीत राज्य अधिवेशन घुमधडाक्यात पार पडले. त्यामध्ये शासना कडून पुढील प्रमाने मागण्या मंजूर करून घेण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यामध्ये अत्यंत महत्वाची जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी. २) कंत्राटी कर्मचान्यांना सेवेत कायम करणे. ३)जी. प. मधील वाहन चालक व शिपाई पद भरती सुरू करणे. ४) धोरण आणि कार्यक्रम मसुदा उराव करणे. ५) संपाच्या अधिकाराचा कायदा झाला पाहिजे. ६) सातव्या केंद्रीय वेतन आयोगातील शैक्षणिक केंद्राप्रमाणे वाहतूक भता, भत्ता, हॉस्टेल भत्ता व इतर सर्व भने राज्य कर्मचारी व निमशासकीय कर्मचारी यांना लागू करावे. ७) लिपिक, लेखा, औषध निर्माण, अंगणवाडी पर्यवेशिका व ग्रामसेवक यांच्या
वेतन त्रुटी संदर्भातील प्रकरणे प्रलंबित आहेत ते सुधारण्याची अमलबजावणी करणे ८) ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी या पदाचे ऐवजी पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करण९) राज्यातील रिक्त पदे तत्पर भरण्यात यावे वरील मागण्याचा पाठपुरावा शासन दरबारी करणार असल्याचे राज्यध्यक्ष यांनी सांगितले आहे. तसेच या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या पाचव्यांदा राज्य अध्यक्ष पदी मा. उमेशचंद्र चिलबुले साहेब यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर राज्य कार्याध्यक्ष पदी श्री प्रशांत जामोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली व इतर 34नवीन पदाधिकारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रशांत जामोदे यांनी या पूर्वी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन चे तालुका अध्यक्ष पासून ते राज्य सरचिटणीस अशा विविध पदावर काम केलेले आहे सदर कामाचा दीर्घ अनुभव त्यांना नूतन पदावर काम करण्यास कामी येणार आहे त्यांची ऑगस्ट महिन्यात विस्तार अधिकारी कृषी या पदावर पदोन्नती पंचायत समिती नांदुरा येथे झालेली आहे त्या नंतर कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर निवडीमुळे त्यांचेवर अभिनंदन च वर्षाव होत आहे जळगाव अमळनेर येथील श्री साई गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहन पाटील विठ्ठल पाटील योगेश बाग यानी त्याचे अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!