ताज्या घडामोडी

बहिरेवाडीमध्ये भैरोबा तालीम मंडळाच्यावतीने शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी

Spread the love

▪️रक्तदान शिबिरात १०० च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग घेतला
▪️आमदार डाॅ.विनय कोरे यांच्या उपस्थितीत मिरवणूकीने कार्यक्रमाची सांगता
*वारणानगर:*
*बहिरेवाडी ता.पन्हाळा येथे शिवजयंती भैरोबा तालीम मंडळाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी आमदार डाॅ.विनय कोरे व वारणा बँकेचे व्यवस्थापकिय अध्यक्ष युवा नेते विश्वेश कोरे यांनी भेट दिली
कार्यक्रमाची सुरूवात पहाटे किल्ले पन्हाळगड येथून शिवज्योत आणून झाली.युवा नेते विश्वेश कोरे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सकाळी नऊ वाजल्यापासून रक्तदान शिबिरास सुरूवात झाली. “रक्तदान हेच जीवनदान” हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बहिरेवाडी गावामधील भैरोबा तालीम मंडळाच्या वतीने दरवर्षी हे रक्तदान शिबीर घेतलं जातं.रक्तदान शिबीराचं आजचं हे पाचवं वर्ष असून आत्तापर्यंत जवळपास 300 रुग्णांना याचा फायदा झालेला आहे.रक्तदान शिबिरास तरूणांचा मोठा प्रतिसाद दिसून आला.जवळ जवळ १०० च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीरात सहभाग घेतला.या रक्तदान शिबिरात युवा नेते विश्वेश कोरे,कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड,बहिरेवाडीचे सरपंच शिरीषकुमार जाधव,युवा उद्योजक विशाल जाधव यांनी भेट दिली. यावेळी विश्वेश कोरे यांचा सत्कार गौरव कावळे यांनी केला.
*हे शिबीर यशस्वी होण्यामधे रक्तदान प्रबोधन चळवळीचे डॉ.अभिजीत जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सांगता आमदार डाॅ.विनय कोरे यांच्या उपस्थितीत भव्य-दिव्य अश्या मिरवणूकीने* *करण्यात आली.यावेळी पारंपारिक वाद्ये आणि लाईट शो यांचे प्रमुख आकर्षण होते.यावेळी बहिरेवाडीचे* *सरपंच शिरीषकुमार जाधव,युवा नेते प्रदिप चव्हाण,मंडळाचे अध्यक्ष प्रविण जाधव,उपाध्यक्ष अनिल भोसले,खजिनदार दिग्विजय जाधव,रोहित जाधव यांच्यासह* *बहिरेवाडी गावामधील सर्व तरुण मंडळांचे शिवभक्त उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!