आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लायन्सक्लब तळेगाव आणि लायन्स क्लब पुणे फ्युचर यांचं मनःपूर्वक  सावित्रीच्या आदिवासी लेकींची ज्ञानार्जनासाठी चाललेली पायपीट लायन्स क्लबने वितरित केलेल्या सायकलींमुळे थांबली !

अमृत महोत्सवाचं औचित्य साधून अकोले तालुक्यातील अति ग्रामीण भागातील खीरविरे येथील विद्यालयात चार ते पाच किलोमीटर रोज पायी येणाऱ्या सर्वोदय विद्यालयातील आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी जवळ जवळ साडेतीन लाख रुपये किमतीच्या 75 उत्तम प्रतीच्या सायकलींचे वितरण..

Spread the love

 

लायन्सक्लब तळेगाव आणि लायन्स क्लब पुणे फ्युचर यांचं मनःपूर्वक  सावित्रीच्या आदिवासी लेकींची ज्ञानार्जनासाठी चाललेली पायपीट लायन्स क्लबने वितरित केलेल्या सायकलींमुळे थांबली !

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे प्रतिनिधी ७ ऑगष्ट 

लायन्स क्लब तळेगाव आणि लायन्स क्लब पुणे फ्युचर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून अकोले तालुक्यातील अति ग्रामीण भागातील खीरविरे येथील विद्यालयात चार ते पाच किलोमीटर रोज पायी येणाऱ्या सर्वोदय विद्यालयातील आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी जवळ जवळ साडेतीन लाख रुपये किमतीच्या 75 उत्तम प्रतीच्या सायकलींचे वितरण शुक्रवार दिनांक पाच ऑगस्ट 2022 या दिवशी करण्यात आला.

तळेगाव लायन्स क्लबचे- माजी प्रांतपाल लायन डॉक्टर दीपकभाई शहा-लायन्स क्लब संगमनेर- लायन्स क्लब पुणे फ्युचर यांचे विशेष आर्थिक योगदान राहिलंय या देखण्या समारंभातील उपस्थितांचे स्वागत तळेगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन मयूर राज गुरव यांनी करताना- लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेची संपूर्ण माहिती आपल्या मनोगतात व्यक्त केली! प्रास्ताविक मनोगतात पुणे फ्युचर क्लबच्या विद्यमान अध्यक्ष लायन वृषाली गानू, यांनी आम्हाला आपण ही सेवेची संधी देत आहात म्हणून आम्हाला विशेष आनंद होत आहे आणि त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आहोत! अशा अत्यंत भावनाशील शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या! तळेगावचे ज्येष्ठ लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी, यांनी -सर्वप्रथम या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक- प्रवर्तक अशोक मिस्त्री, यांच मनापासून अभिनंदन केले.

त्यांच्याविषयी कृतज्ञताही व्यक्त केली! विकसित आदर्श व्यक्तिमत्त्वाची लक्षणे सांगून–लायन डॉक्टर भंडारींनी आपल्या मनोगतात भविष्यातील विकसित व्यक्तिमत्व मी या विद्यार्थ्यांमध्ये पाहतो आहे असे सांगून विद्यार्थ्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा दिल्यात! याप्रसंगी मुख्य संयोजक– लायन अशोक मेस्त्री म्हणाले की ज्या समाजाने आम्हाला घडवलेल आहे त्या समाजाचे उतराई होण्याची संधी आम्ही लायन सभासद सतत घेत असतो! सत्य निकेतन संस्थेचे पदाधिकारी आणि कोषाध्यक्ष विवेक मदन,यांनी मला संस्थेत काम करण्याची संधी दिली! या संस्थेत कार्यरत असताना आपल्या आयुष्याची दिशाच बदलून गेली असं त्यांनी आपल्या मनोगतात आवर्जून सांगितलं! संस्थेचे सचिव, टी एन कानवडे सरांनी लायन्स क्लब आणि सत्य निकेतन या संस्थेचे अतूट नातं निर्माण झालेल आहे.

याविषयी विशेष समाधान आणि आनंद व्यक्त केला!या समारंभास लायन्स क्लब तळेगावचे खालील सभासद उपस्थित होते–मा झेड सी प्रमिला वाळुंज- माजी अध्यक्ष लायन नंदकुमार काळोखे- माजी अध्यक्ष लायन सुनील वाळुंज- लायन प्रकाश पटेल आणि लायन डॉक्टर सचिन पवार! तसेच लायन्स क्लब पुणे फ्युचरच्या- लायन रोहिणी नागवणकर लायन दिलीप अंबवले लायन मेघा अंबवले लायन सुनील ओक हे सभासद उपस्थित होते*! सत्यनिकेतन संस्थेचे संचालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!