ताज्या घडामोडी

कांदिवली मध्ये मा.भाजपा नगरसेवक बाळा तावडे व्दारा ” श्रवण यंत्रा” (कानातील मशिन) चे वाटप

Spread the love

भारत कवितके मुंबई
मुंबई मधील कांदिवली चारकोप मध्ये भाजपा नगरसेवक व विधानसभा मंडळ अध्यक्ष बाळा तावडे, यांच्या कार्यालयात ” श्रवण यंत्राचे ( कानातील ऐकू येण्याचे मशिन )चे वाटप करण्यात आले. रिहाना गुजर वय वर्षे २४ या मूक व कर्ण बधिर मुलीस ऐकू येण्यासाठी ” श्रवण यंत्र दिले त्यावेळी तीला ऐकू येऊ लागले व तिच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू आले,व तिला ऐकू येत असल्याचे खुणेने सांगितले.तिच्या बरोबर तिचे नातेवाईक ईस्माईल मोमीन आलेले होते.त्यांनी या बाबत मा.नगरसेवक बाळा तावडे, यांचे मनापासून आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली.या श्रवणयंत्र वाटपा वेळी मा.नगरसेवक बाळा तावडे, पत्रकार, साहित्यिक, सामाजीक कार्यकर्ते,, भारत कवितके, वार्ड क्रमांक २० चे अध्यक्ष आर.एस.वर्मा,संतोष जाधव,प्रविण पाल उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!