आपला जिल्हाक्राईम न्युजपिंपरी चिंचवडमावळ

संघटित गुन्हेगारी उखडून फेकण्यासाठी पोलिसांचा पुन्हा “ मोका पॅटर्न “.

डोंगरे, परदेशी, मोतीरावे या टोळ्यांसह इतर २४ टोळ्यांतील २२६ अट्टल गुन्हेगारांवर कारवाई…

Spread the love

संघटित गुन्हेगारी उखडून फेकण्यासाठी पोलिसांचा पुन्हा “ मोका पॅटर्न “.डोंगरे, परदेशी, मोतीरावे या टोळ्यांसह इतर २४ टोळ्यांतील २२६ अट्टल गुन्हेगारांवर कारवाई…”Moka pattern” of police again to root out organized crime. Action against 226 persistent criminals from 24 other gangs including Dongre, Pardeshi, Motirave gangs…

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, ३१ जुलै.

पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष दिले असून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. सन २०२३ मध्ये आजपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील २४ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण २२६ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तसेच पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यापासून संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या आरोपीवर वर्षानिहाय सन २०१८-०७, सन २०१९-५९. सन २०२०-५० सन २०२१-१८७, सन २०२२-१२९. सन २०२३-२२६ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

दरम्यान पिंपरी, भोसरी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरे, परदेशी, मोतीरावे या तीन टोळ्यांवर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे.

पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ६२५/२०२३ भा.द.वि. कलम ३०२, १२० (ब) २०१, १४३, १४७, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५) (२७) म.पो. अधि. ३७ (१) सह १३५ अन्वये आरोपी यशंवत उर्फ अतुल सुभाष डोंगरे, (टोळी प्रमुख) वय २२ वर्षे, रा. गल्ली नं. ३ पोलीस चौकी मागे, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे, सुशांत ऊर्फ दगडी आण्णा अनिल जाधव, वय १९ वर्षे, रा. रुम नं.४१३, भिमाई हो. सोसा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिपरी, पुणे, आकाश रंजन कदम, वय २१ वर्ष, रा. घर नं. २१०/१६२७, शनि मंदिराजवळ, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे, शुभम कैलास हजारे, वय २५ वर्षे, रा. फ्लॅट नं. ३०२, मोनल हो. सोसा. क्यू सेक्टर /४, अजमेरा, पिंपरी, अजिंक्य अरुण टाकळकर, वय २१ वर्ष, रा. शिवाजी वाडी, कुदळे रेसीडेन्सीच्या बाजुला, मोशी, पुणे, सुशांत ऊर्फ भैय्या आजिनाथ लष्करे, वय २२ वर्षे, रा. सुदर्शन गणपती मंदीर चौक, शालिनी पॅलेस, फ्लॅट नं. २८, खराळवाडी, पिंपरी, मयुर प्रकाश परब, वय २२ वर्षे, रा. विनीत प्लाझा, वल्लभनगर, पिपरी, कृष्णा थोंडीराम शिंदे, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं.२, संत तुकारामनगर, पिपरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण ०८ गुन्हे दाखल असून ०७ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेले आहेत.

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.न. ३०२ / २०२३ भारतीय हत्यार कायदा चे कलम ३ (२५) ४ (२५) भादवि क १२०(ब). ११५. ३४ मपोका ३७ (१) (३) सह १३५ आरोपी सुधीर अनिल परदेशी (दोळी प्रमुख) वय २५ वर्ष रा फ्लैट नं २०३ साई धाम सोसायटी, केशवनगर, वडगाव, ता मावळ, विवेक नंदकिशोर लाहोटी, वय ४२ वर्ष रा ए. १/२, एच.डी.एफ.सी. शाहुनगर, चिंचवड, प्रतिक्षा विक्रांत भोईर वय २९ वर्ष, केशवनगर, नवरंग सोसायटी, वडगाव ता. मावळ, पाहिजे आरोपी शरद मुरलीधर साळवी ३० वर्ष, रा, धनगरचाचा मंदौर मागे, ज्ञानेश्वर कॉलनी, काळेवाडी, पुणे, मूळ रा. मदनापुर, जालना, भाऊ (पूर्णनाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण ०६ गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.

भोसरी पोलीस ठाणे गु.र.नं. ४६३/२०२३, भादवि. ३९४, ३४ आर्म अॅक्ट ४ (२५) म.पो.का. कलम ३७ (१) सह १३५, सौरभ संतुराम मोतीरावे (टोळी प्रमुख) वय २० वर्षे रा. हनमान वाडी, हनुमान टेकडी केळगाव रोड, आळंदी पुणे, आकाश गोविंद शर्मा, वय २२ वर्षे रा. मातोश्री पार्क, संत तुकारामनगर, भोसरी पुणे, राम सुनिल पुजारी, वय २१ वर्षे रा. बोराटे चाळ, मुनलाईट बार शेजारी, मोशी, ओमकार मल्हारी दळवी, रा. साई मंदीराचे जवळ, हॉटेल राणजत्रा मागे, वाघ यांची रुम, दिघी पुणे. यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ९ गुन्हे दाखल असुन ६ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे.

वरील तीनही टोळी प्रमुख यांनी त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करून अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करून अथवा हिंसाचाराची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवून टोळी प्रमुख व साथीदार यांनी पिंपरी, चाकण, तळेगाव दाभाडे, भोसरी, कोपरगाव पोलीस स्टेशन हदीत खून, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, दुखापत करून जबरी चोरी करणे, पुरावा नष्ट करणे, दुखापत करणे, घरात घुसून मारहाण करणे. गैरकायद्याची मंडळी जमविणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे गाडयांची, सामानाची तोडफोड व जाळपोळ करुन नुकसान करणे, असे आपल्या टोळी सदस्यांकडुन गुन्हे घडवून आणणे व दहशत निर्माण करणे, दहशत माजवुन नागरिकांना वेठीस धरणे, पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी काढलेल्या आदेशांचा भंग करणे, अशा प्रकारे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमानसात दहशत रहावा हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखांनी गुन्हे केलेले आहेत.

डोंगरे टोळी, परदेशी टोळी व मोतीरावे टोळी या तीनही संघटीत टोळीतील साथीदार यांनी आपल्या गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व रहावे व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचे गुन्हे केल्याचे दिसून आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करून नमूद मुन्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.

ही उल्लेखनिय कामगिरीमा पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त (परि-०१) विवेक पाटील, सपोआ सतिश माने (गुन्हे), बाळासाहेब कोपनर (गुन्हे-१), सपोआ पद्माकर घनवट (देहूरोड विभाग), सपोआ सतिश कसबे (पिंपरी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पी.सी.बी (गुन्हे शाखा), वपोनि राम राजमाने (पिंपरी पो.स्टे) वपोनि भास्कर जाधव, पोउपनि सुहास खाडे (भोसरी पो.स्टे), वपोनि जितेंद्र कदम, सपोनि अंबरिष देशमुख (दरोडा विरोधी पथक) तसेच अंमलदार पो.हवा सचिन चव्हाण, पो.हवा. व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा, सपोफौ अनिल गायकवाड, पो.ना ओंकार बंड, पो.शि. दत्ताजी कोठेकर पिपरी पो.स्टे., पो.ना.सागर शेंडगे, पोशि विनोद वीर (दरोडा विरोधी पथक) पोहवा मच्छिंद्र बांबळे, पोशि संदिप जोशी (भोसरी पो. स्टे.) यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!