ताज्या घडामोडी

शेगांव निवासी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्सव साजरा

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

श्री साई गजानन परिवाराने केले होते आयोजन•••* श्री साई गजानन परिवाराने , दर वर्षीप्रमाणेच ह्या वर्षालाही श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा बुधवार दि.23:2:2022 रोजी साजरा केला त्यात खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सकाळी:7:00 वा.गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण करण्यात आले. सकाळी 8:30 वाजता वाद्यच्या गजरात पालखी मिरवणूक डहाले सरांच्या घरुन निघाली. बहु संख्य गजानन भक्त मिरवनुकित सामिल झाले पालखी अड़.गजानन विन्चुरकर यांच्या घरी पुजा होऊन सुरेश एन पाटील यांच्या कडून देशमुख सरांकडे महाआरती करण्यात आली तेथून योगेश मुकुंद बाग यांच्या निवासस्थानि माऊलीची आरती करून भेट करण्यात आली कचेरी समोरून पालखी मिरवणूक गजानन हॉलला नेन्यात आली जि प सदस्या सौ जयश्री ताई यांनी भेट दिली असता गजानन परिवारचे अध्यक्ष एस एम पाटील व विठ्ठल पाटील यांनी सौ जयश्री ताईंचे स्वागत सत्कार केला त्याच बरोबर समाजसेवक दीपक पाटील , प्रवीण सनेर सर, संदीप पाटील व रंजना ताई देशमुख यांचाहि सत्कार करण्यात आला तर सकाळी 11:00 वाजता सत्संग कार्यक्रमास सड़ावन, चाकवे,नेरपाट येथील गजानन भक्तानि सत्संगात गजानन महाराजांचे भजने, गवळणी, गायन करण्यात आले –दुपारी 12:00 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सर्व भाविकांनी परिवारातील सदस्यांसह महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
जगतगुरु गुरुवर्य बहुउद्धेशिय सेवा मंडलाचे शिवाजी मोहन पाटील ,गुणवंत पवार,एस डी सोनवणे ,ए टी पाटील ,जितेंद्र बोरसे ,विठ्ठल पाटील ,गणेश बोढरे ,रमेश व्ही पाटील ,डी ई पाटील ,नामदेव महारु पाटील , गुलाब पाटील, योगेश पाटील, योगेश बाग, मुकेश सालुंखे, सुनील मुंडले, निळ दादा, राजेंद्रसिंग वा.पाटील ,सुनीता पाटील ,ललिता पाटील ,चंद्रशेखर वैद्य ,सौ छाया अशोक इसे ,श्री राजेंद्र सोनवणे ,श्री दिलीप प्र.सोनवणे ,योगिता शिरीष ड हा ळे ,वाल्मिक मराठे ,शिरीष ड हा ळे , अशोक इसे,गायत्री ताई,सैंदाने सर,संदीप पाटील,सर्व गजानन महाराज भक्त यांनी परिश्रम घेतले.श्री साई गजानन सेवा मंडळ
जगतगुरु गुरुवर्य बहुउद्धेशिय सेवा मंडळ अमळनेरचे विशेष सहकार्य लाभले ईगल न्यूज़ प्रतिनिधि एस एम पाटील यांनी उपस्थितितांचे आभार मानलेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!