ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची वारणा धरणाला भेट देऊन पाहणी

Spread the love

शिराळा प्रतिनिधी :
शिराळा तालुक्यात पडणाऱ्या पावसाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी वारणा धरण येथे भेट देऊन पाहणी केली. धरण क्षेत्रातून करण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत, धरणातील पाणी पातळी, पर्जन्यमान, अतिवृष्टी कालावधीत करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व संबंधितांना दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या.
यावेळी वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, शिराळा तहसीलदार गणेश शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, वारणा उपअभियंता मिलिंद किटवाडकर, शिराळा वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे सोबत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!