ताज्या घडामोडी

शिक्षक आमदारांचे शिक्षण मंत्र्यांना साकडे, शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करा

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक १० ऑक्टोबर २०२२ पासून आझाद मैदान, मुंबई येथे शिक्षक समन्वय संघ व अघोषित महासंघ धरणे आंदोलन करणार्‍या शिक्षकांना न्याय देण्याचे काम अद्याप राज्य सरकारने केलेले नाही. या लढाईत आंदोलक शिक्षक आमदारांनीही साथ देत विधानभवनासमोर सहकारी आमदारांसह धरणे आंदोलन केले होते. त्याची दखल घेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आमदारांची भेट घेऊन दि. १ नोव्हेंबरला सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांसोबत सविस्तर बैठक करून दि. १५ नोव्हेंबरपर्यंत त्रुटी पूर्तता व अघोषित शाळांच्या याद्या घोषित करून येणाऱ्या अधिवेशनात आर्थिक तरतूद देऊ असे सांगितले होते. मात्र अजूनही कोणतीच कार्यवाही दिसत नाही.

शिक्षक आमदारांनी एका कार्यक्रम ठिकाणी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची मंगळवारी भेट घेतली.या भेटीत शालेय शिक्षण मंत्री यांनी पुढील दोन-तीन दिवसांत कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मंत्रालयात संबंधित अधिकार्‍यांना भेटूनही यासंदर्भात शिक्षकांना माहिती जाणून घेतली. तसेच आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून मागण्या पूर्ण कराव्यात ही विनंती केली आहे.

यावेळी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, आमदार विक्रम काळे,आमदार किशोर दराडे, आमदार जयंत आसगावकर ,आमदार अरुण लाड, माजी आमदार श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!