ताज्या घडामोडी

बसव जयंतीनिमित्त १२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. ५ (प्रतिनिधी)

समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. ५) रोजी मुरूम येथे महात्मा बसवेश्वर युवक मंडळाकडून रक्तदान शिबीर घेण्यात आले. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महात्मा बसवेश्वर युवक मंडळाच्या वतीने बसव जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबीर घेण्यात येते. मंडळाच्या पुढाकारातून यावर्षी शहरातील माहेश्वरी सांस्कृतिक भवन येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते. जयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या आव्हानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात मुरूमसह परिसरातील बेळंब, केसरजवळगा येथील युवकांनी रक्तदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या शिबिरात १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी विकासोसेचे चेअरमन दत्ता चटगे, रविंद्र कारभारी, महालिंग बाबशेट्टी, योगेश राठोड आदींची उपस्थिती होती. रक्तदान शिबिरासाठी मंडळाचे अध्यक्ष विलास वाडीकर, उपाध्यक्ष शिवा दुर्गे, सचिव राजकुमार वाले, माजी अध्यक्ष दत्ता हुळमजगे, रविकिरण अंबुसे, जगदीश निंबर्गे, पृथ्वीराज गव्हाणे, भगत माळी, प्रताप गिरीबा, देवराज संगुळगे, सिद्धलिंग अंबुसे, राजकुमार लामजने, खंडू सरसंबे, शेखर विभूते, विनायक भोसगे, रविराज गुंडगोळे, ओंकार पाटील आदींनी पुढाकार घेतला होता. सर्व रक्तदात्यांना मंडळाकडून नामवंत कंपनीचे गॉगल भेट देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!