ताज्या घडामोडी

मांगले-सावर्डे बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर – आमदार मानसिंगराव नाईक

Spread the love

प्रतिनिधी

शिराळा व पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदायिनी असलेल्या मांगले सार्वर्डे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा दुरुस्तीचे काम चांगल्याप्रकारे प्रगतीपथावर सुरु असुन पन्नास टक्के काम पुर्ण झाले असुन उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली मांगले ता शिराळा येथील मांगले सार्वर्डे कोल्हापूर पध्दतीच्या बंधारा दुरुस्तीच्या कामाची पहाणी केली यावेळी वारणा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता मिलींद किटवाडकर उत्तम पाटील तुकाराम पाटील सतिश पाटील यांनी कामाची माहिती देऊन चर्चा केली यावेळी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले बंधारा दुरुस्तीसाठी नदीच्या पात्रात घातलेला मातीचा बांध काम पुर्ण झाल्यानंतर काढुन नदी पात्र सुरळीतपणे सुरु करावा त्याचबरोबर बंधाऱ्याच्या दक्षिणेकडील आरसीसी भिंत बांधुन धरणाची रूंदी वाढवावी अशा सूचना दिल्या . यावेळी समीर कुलकर्णी डॉक्टर सतिश पाटील विश्वास चे संचालक संचालक सुरेश पाटील दत्तात्रय पाटील संदिप तडाखे विजयकुमार पाटील डॉक्टर उत्तम बच्चे संदिप शिंदे माजी सरपंच उदय पाटील राहुल पवार सतिश पाटील जयवंत पाटील दिपक पाटील रामचंद्र पाटील आशोक महाजण तानाजी कुंभार वारणा व मोरणा काठावरील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते चौकट आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून तिन कोटी चौदा लाख रुपयांचे बंधारा दुरुस्ती चे काम दर्जेदार पणे सुरु असल्याने वारणा व मोरणा नदीकाठावरील दहा हजार एकराहुन अधिक शेतीला मुबलक पाणी या बंधारा दुरुस्ती मुळे मिळणार असल्यामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!