ताज्या घडामोडी

कोल्हापूरमध्ये कामगार भवन करून कामगारांना लाभ मिळवून द्यावा यासाठी, मंत्री सुरेश खाडे यांचेकडे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची आग्रही मागणी

Spread the love

कोल्हापूर :
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही शासनाची स्वायत्त संस्था असून, या मंडळाच्यावतीने कामगार व कामगार कुटुंबीय यांच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीकरीता विविध योजना व उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते.
मंडळाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ तसेच सभासद होणेकामी कोल्हापूर गट कार्यालय सातत्याने आघाडीवर आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून व अनेक राज्यातून वाढलेली कामगार संख्या, औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, वीज महामंडळ, बँका, दूध संघ, सूतगिरणी, व्यापारी संकुले, लहान मोठी हॉटेल्स, लहान मोठे कारखाने व या अनुषंगाने वाढलेले संघटित व असंघटित कामगार तसेच कामगार कुटुंबीये. अशा अनेक कारणामुळे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा व उपक्रमांचा लाभ घेणाऱ्या कामगार व कामगार कुटुंबियांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. गट कार्यालय कोल्हापूर तसेच या अंतर्गत येणारी सर्व केंद्रे ही सध्या भाड्याच्या जागेत अपुऱ्या व जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे मंडळाच्या विविध उपक्रमांचा कोल्हापूर जिल्ह्यातील कामगार व कामगार कुटुंबीयांना अजिबातच लाभ मिळत नाही. मंडळाच्यावतीने राज्यातील इतर शहरांमध्ये अद्यावत स्विमिंग टॅंक, जिम्नॅस्टिकचे खेळ, बहुउद्देशीय हॉल, अद्यावत लायब्ररी, व्यायामशाळा, मैदानी खेळ आदी. विविध उपक्रम राबवून कामगार व कामगार कुटुंबियांना लाभ दिला जातो. पण कोल्हापूर जिल्ह्यामधील कामगार व कामगार कुटुंबीये या लाभापासून पूर्णपणे वंचित व उपेक्षित आहेत. त्यामुळे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचेवतीने महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा. ना. सुरेश खाडे साहेब यांचेकडे कोल्हापूर शहरांमध्ये तसेच ज्या जिल्ह्यामध्ये अद्यापही कामगार भवन नाही, त्या सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा कामगार भवन उभारणे कामी सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारावा अशी लेखी विनंती राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचे शिष्टमंडळाच्यावतीने मा. ना. कामगार मंत्री महोदयांकडे करणेत आली. त्यास अनुसरून मंत्री महोदयांनी लवकरच कोल्हापूर शहरांमध्ये व उर्वरित इतर जिल्ह्यांमध्ये कामगार भवनची उभारणी करून कामगार वर्गाला सर्व सोई सुविधा व उपक्रमांचा लाभ मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी मा. ना. मंत्री महोदयांना निवेदन देतेवेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचेवतीने अध्यक्ष सुरेश केसरकर, खजानीस महादेव चक्के, विभागीय सदस्य शिवाजी चौगुले, जेष्ठ सल्लागार संजय सासणे त्याचबरोबर कामगार कल्याण मंडळाचे सांगली जिल्ह्याचे कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार व केंद्र संचालक सचिन खराडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!