राजकीय

मानवहीत लोकशाही पक्षात‌ सिल्लोड शहर तसेच ग्रामीण भागातील युवकांचा प्रवेश

Spread the love

 

सिल्लोड युवा शहराध्यक्षपदी महेंद्र आहीरे ,युवा शहर उपाध्यक्षपदी सागर खेत्रे, युवा सचिवपदी समाधान आहीरे यांची निवड सिल्लोड शहरातील शासकीय विश्रामगृहात मानवहीत लोकशाही पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड शहर व सिल्लोड ग्रामीणमधील मातंग समाजातील युवाकांनी मानवहीत लोकशाही पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे नेते मानवहीत लोकशाही पक्षाचे औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष सखाराम आहीरे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे औरंगाबाद जिल्हा सरचिटणीस राजु साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मातंग समाजातील जनतेला भुलथापा देऊन त्यांची दिशाभूल करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंडळाच्या फायली मंजुर करणे, गायराण जमीनी नावावर करणे,आदी शिसकीय योजनेचा लाभ मिळवुन देण्याच्या भुलथापांना व आमिषाला कोणीही बळी पडु नये महाराष्ट्रातील व तालुक्यातील गायराण जमीन धारक,घरकुल लाभार्थी, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह यासारखे मातंग समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मानवहीत लोकशाही पक्षाचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांची भेट घेणार असल्याची माहिती सखाराम अहिरे तसेच राजु साठे, नानासाहेब गायकवाड यांनी दिली.
यावेळी सिल्लोड युवा शहराध्यक्षपदी महेंद्र आहीरे ,युवा शहर उपाध्यक्षपदी सागर खेत्रे, युवा सचिवपदी समाधान आहीरे,
शहर कार्याध्यक्ष विष्णू सोनवणे,सिल्लोड शहर सल्लागार किसन सौदागर,सिल्लोड शहर सरचिटणीस दिपक महाले ,सिल्लोड शहर सहकार्याध्यक्ष सुनिल आहीरे,सिल्लोड शहर
कोषाध्यक्ष राजेंद्र गोफणे,सिल्लोड शहर संघटक विठ्ठल कांबळे,सिल्लोड शहर सहसचिव भगवान कांबळे, सिल्लोड शहर सहकोषाध्यक्ष विलास कांबळे,युवा शहर सहसचिव स्वप्नील सौदागर ,युवा शहर कार्याध्यक्ष संतोष महाले, युवा शहर सहकार्याध्यक्ष हरिष सौदागर, युवा शहर कोषाध्यक्ष कृष्णा सोनवणे , युवा शहर संघटक रोहीत सोनवणे , युवा शहर सहसंघटक सागर सोनवणे,युवा शहर संपर्कप्रमुख अभिषेक सुरासे, युवा शहर सहसंपर्कप्रमुख अमोल लोदळे,आमठाणा सर्कल प्रमुख बंडु चंदनशिवे, तालुका युवा सहसंपर्कप्रमुख सुभाष कांबळे आदी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या
यावेळी मानवहीत लोकशाही पक्षाचे सिल्लोड तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड, युवा तालुकाध्यक्ष फकीरचंद तांबे, शहराध्यक्ष मनोज अहिरे महीला तालुका उपाध्यक्षा सोनाबाई गायकवाड सिल्लोड शहर उपाध्यक्ष साहेबराव सोनवणे,सिल्लोड शहर सचिव रवींद्र महाले, तालुका उपाध्यक्ष बाबूराव अहिरे, तालुका सचिव शिवराम कांबळे, युवा तालुका उपाध्यक्ष सुखदेव कांबळे, तालुका कार्याध्यक्ष पृथ्वीराज सोनवणे, युवा तालुका कार्याध्यक्ष दादाराव शिरसाट, तालुका सरचिटणीस मधुकर कांबळे, तालुका संघटक रमेश चंदनशिवे, तालुका कोषाध्यक्ष संतोष काळे, तालुका सल्लागार दिपक दनके, युवा तालुका सहसंघटक नितीन दनके , संदीप कांबळे,सुभाष कांबळे,महादु चंदनशिवे,बाळु चदनशिवे,जयेश सौदागर,सोपान सौदागर,समाधान आहीरे, यांच्यासह आदी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!