महाराष्ट्रराजकीय

मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी, वडीलांना’ही हा निर्णय आवडल नसेल – बाळासाहेब थोरात

Spread the love

मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी, वडीलांना’ही हा निर्णय आवडल नसेल – बाळासाहेब थोरात.

आवाज न्यूज : मुंबई प्रतिनिधी, १४ जानेवारी.

मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी, वडीलांना’ही हा निर्णय आवडल नसेल – बाळासाहेब थोरात.

आजपासून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभ होत असून, त्यापूर्वीच काँग्रेस’ला एक मोठा धक्का राज्यात बसला आहे. काँग्रेसचे माजी खासदार मुंबईतील प्रमुख नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील वाद समोर आला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे.

तर मिलिंद देवरा यांच्या पक्षातून जाण्याने राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात ह्यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटर (एक्स) वर दिली असून, मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे असं म्हंटले आहे.

काय म्हणाले थोरात.!

आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणा-या राहुल गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!