महाराष्ट्रमावळराजकीय

महाराष्ट्र प्रदेश च्या सचिवपदी महेश बेंजामीन यांची नियुक्ती.

Spread the love

महाराष्ट्र प्रदेश च्या सचिवपदी महेश बेंजामीन यांची नियुक्ती.Appointment of Mahesh Benjamin as Secretary of Maharashtra Pradesh.

आवाज न्यूज : प्रतिनिधी, १८ जानेवारी.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभाशीर्वाद  कार्याध्यक्ष मा. खासदार. प्रफुल्लभाई पटेल,  अध्यक्ष मा. खासदार सुनील तटकरे  यांच्या मार्गदर्शनाखाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अल्पसंख्यांक विभाग, महाराष्ट्र प्रदेश च्या सचिवपदी महेश बेंजामीन यांची नियुक्ती केली आहे.

सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांची आपणाशी जोडलेली नाळ सर्व सामान्यांच्या समस्या सोडविण्याची हातोटी नागरिकांना भेडसावणा-या समस्या, आलेल्या आंदोलनातील आपला उस्फूर्त प्रतिसाद अनेक बाबींची दखल घेत, अत्यंत विश्वासाने घेतलेली जबाबदारी आपल्यावर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकाभिमूख सामाजिक कार्याची सर्व समावेशक विचारधारा  जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटनेने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण सुयोग्य रितीने सांभाळाल हा विश्वास आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासोबत आपल्या विभागातील जनसामान्यांना अपेक्षित असलेले समाजहिताचे कार्य करण्याची आपण प्रयत्नांची पराकाष्ठा कराल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी पतिमा उंचवाल या विश्वासासह,पुढील प्रगतीशील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

वसीम हाजी ख्वाजाभाई ब-हाण प्रदेश कार्याध्यक्ष अल्पसंख्यांक, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश.इब्रिस इलियास नायकवडी राष्ट्रवादी काँग्रेस राज्य प्रमुख अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश. यांच्या नियुक्ती पत्रावर सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!