ताज्या घडामोडी

नाशिक,दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून देवळाली मतदार संघातील विविध समस्यांची दखल.

Spread the love

नाशिक,देवळाली मतदार संघातील गंगावऱ्हे येथील “गौरी योजना”बचत गटाच्या महिलांनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी, दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशनच्या अध्यक्ष प्रो.सुवर्णा भिकचंद दोंदे यांना आमंत्रित करण्यात आले,त्या अनुषंगाने आज त्या भागातील महिलांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

 

अतिशय ह्दय विदारक समस्या महिलांनी प्रो.सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्यासमोर मांडल्या,एकीकडे महिला सबलीकरण,विविध योजनांच्या मोठमोठ्या बाता केलेल्या जातात,आणि एकीकडे महिलांना रेशन कार्ड नाही,रेशनकार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना धान्य नाही,महिला बचत गटांना काम नाही,कर्जही मिळत नाही,सरकारी कामांसाठी महिलांकडून पैश्यांची मागणी करण्यात येते,कोरोना पार्श्वभूमीवर ह्या भागातील लोकांना कोणतीही मदत करण्यात आली नाही,शालेय शिक्षणात ह्या भागातील हातमजुरी करणाऱ्या पालकांकडून जास्त फि आकारली गेली,ह्या लोकांना हक्काचे घरकुल नाहीत,पक्की घरे नाहीत.
विधवा,निराधार असणाऱ्या महिलांपर्यंत केंद्र सरकारची “संजय गांधी निराधार योजना”देखील पोहचलेली नाही,याची दखल दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून नक्कीच घेत,तळागाळातील जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यात येणार आहे व त्यांचे समस्या निराकरण करण्यासाठी दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशन सदैव कटिबध्द राहणार असे प्रतिपादन प्रो.सुवर्णा भिकचंद दोदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!