क्रीडा व मनोरंजन

जय दत्‍तगुरू क्रीडा मंडळ, दादर आयोजित जिल्‍हास्‍तरीय कबड्डी

Spread the love

विजयक्‍लब, गोलफादेवी, अमर व विकास क्रिडा मंडळाची विजयी सलामी

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई दि. ११ मे (क्री. प्र.), जय दत्‍तगुरू क्रीडा मंडळ, दादर आयोजित जिल्‍हास्‍तरीय कबडडी ‘’कुमार गट’’ स्‍पर्धेचे आयोजन दत्‍ता राऊळ मैदान, दादर या क्रिडांगणात दि. १० ते १४ मे २०२२ या कलावधीत करण्‍यात आलेले असून सदर स्‍पर्धेच्‍या उदघाटन प्रसंगी डॉ. अख्‍तर हसन रिझवी, प्रेसिडेंट ऑफ रिझवी एज्‍युकेशन सोसायटी, अॅड. रुबिना अख्‍तर हसन रिझवी, डायरेक्‍टर ऑफ रिझवी एज्‍युकेशन सोसायटी, प्रो कबड्डी खेळाडू श्री अजिंक्‍य खापरे, जय दत्‍तगुरू क्रिडा मंड‍ळाचे अध्‍यक्ष श्री. निलेश सावंत, प्रमुख कार्यवाह श्री. उमेश लांजेकर आणि स्‍पर्धा निरिक्षक श्री. मनोज नमसले हजर होते.

उदघाटनीय सामना विजय क्‍लब विरूध्‍द स्‍नेहसागर क्रिडा मंडळ या संघांमध्‍ये झाला. या सामन्‍यात विजय क्‍लबने स्‍नेहसागरवर ५२-११ असा ४१ गुणांनी ए‍कतर्फी धुव्वा उडवला. विजयी संघातर्फे वेदांत येरुणकर याने अष्‍टपैलु खेळ करताना चढाईत १५ गुण व पकड करताना ६ गुण मिळवले. तसेच आयुश साळवी याने चढाईत करून संघासाठी १० गुण व साहिल टिकेकर याने पकडीमध्‍ये ४ गुण प्राप्‍त करून उत्‍कृष्‍ट साथ दिली. पराभूत संघाकडून चढाईत उत्‍तम सिंगने ५ गुण, आदर्श सिंगने ३ गुण मिळवून चांगला खेळ केला.

दुस-या सामन्‍यात विश्वजीत जानकर आणि प्रतिक मयेकर यांच्‍या अष्‍टपैलू खेळाच्‍या जोरावर अमर क्रिडा मंडळाने अमर हिंद मंडळाचा ५३-३४ असा १९ गुणांनी पराभव केला. विश्वजीत जानकरने २१ आणि प्रतिक मयेकरने १५ गुण मिळविले. पराभूत संघातर्फे समराज नाडा याने चढाईत १३ गुण प्राप्‍त केले त्‍यास साहिल शिगवण याची उत्‍कृष्‍ट साथ लाभली

तिस-या सामन्यात गोलफादेवीने हिंदकेसरीवर ४७-३६ असा ११ गुणांनी विजय संपादन केला. गोलफादेवीकडून चढाईत राज सरोज १५ गुण, सनी कोळी ११ गुण तर ओमप्रकाश पासवान पकडीत ७ गुण मिळवले हिंदकेसरीतर्फे आयुष ठाकूर याने चढाईत १३ गुण प्राप्‍त केले त्‍यास साहिल तळेकर ६ व जयवंत खरात ५ गुण यांची उत्‍कृष्‍ट साथ लाभली.

इतर सामन्‍यात विकास क्रिडा मंडळाने न्‍यु परशुराम क्रिडा मंडळाचा ५०-२० असा धुव्‍वा उडवला. विजयी संघातर्फे विराज सिंग याने अष्‍टपैलू खेळ केला तर पराभूत संघातर्फे सिध्‍देश माजलेकर याने उत्‍कृष्‍ट खेळ केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!