आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

श्रीरंग कलानिकेतनची कवयित्री कै. शांता शेळके यांना भावसुमनांजली

Spread the love

श्रीरंग कलानिकेतनची कवयित्री कै. शांता शेळके यांना भावसुमनांजली
‘असेन मी ….नसेन मी…..’

सुप्रसिद्ध सिद्धहस्त कवयित्री कै. शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे येथील श्रीरंग कलानिकेतन या संगीत क्षेत्रात कार्यरत असेल्या संस्थेने ‘असेन मी ..नसेन मी…’ या अनोख्या संगीत मैफिलीद्वारे त्यांना भाव सुमनांजली वाहिली.

कांतीलाल शहा हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कांतीलाल शहा हायस्कूलच्या ट्रस्टचे व्हाईस प्रेसिडेंट मा. चंदूभाई शहा, श्रीरंग कलानिकेतनच्या अध्यक्षा डॉ.नेहा कुलकर्णी व श्रींरंग कलानिकेतनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.8

जय शारदे वागेश्वरी…..या लीना परगी यांनी गायलेल्या गीतानी कार्यक्रम सुरु झाला व त्यानंतर तोच चंद्रमा नभात….(सम्राट काशीकर),काटा रुते कुणाला……(संपदा थिटे), ही वाट दूर जाते… अशा एकापेक्षा एक सुंदर गीतांनी मैफिलीत रंग भरला. त्यावर कळस केला ‘खोडी माझी काढाल तर …..’ या सम्राट काशीकर यांच्या कन्येने (अंतरा काशीकर) गायलेल्या ठसकेबाज गाण्याने, रसिकांची भरभरून दाद मिळवली. डॉ.सावनी परगीच्या ‘शालू हिरवा…..’, ‘शारद सुंदर चंदेरी राती…’,’रेशमांच्या रेघांनी…रसिकांना ताल धरायला लावला. राजीव कुमठेकरांच्या ‘दाटून कंठ येतो…ही चाल तुरु तुरु….,असेन मी नसेन मी….या गाण्यांनी रसिकांची मने जिंकली.संपदा थिटे यांच्या कसलेल्या आवाजातील ‘का धरिला परदेस…..कान्हु घेऊन जाय… या गीतांनी कार्यक्रमाची उंची वाढविली. लीना परगींच्या ‘दिसते मजला सुख चित्र नवे……’,आणि ‘वादळ वार सुटल ग….’ या गीतांना पण छान दाद मिळाली. सम्राट काशीकर यांनी गायलेल्या शूर आम्ही सरदार आम्हाला……’ व ‘माझे राणी…..’ या संपदा थिटेंच्या बरोबर गायलेल्या द्वंद्व गीताला प्रेक्षकांच्या टाळ्यांची दाद मिळाली.

शेवटच्या ‘मराठी पाऊल पडते पुढे…’ या गीताच्या जोशपूर्ण सादरीकरणाने सुंदर मैफिलीची सांगता झाली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. कांचन सावंत यांनी केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण रसाळ भाषेने रसिकांना मोहून टाकले.

या सुंदर मैफिलीला संवादिनी -श्री.प्रदीप जोशी, सिंथसायजर-श्री.राजेश झिरपे, तबला-श्री. मंदार परगी, अनिरुद्ध जोशी. ढोलकी, ऑक्टोपॅड- श्री. प्रविण ढवळे व तालवाद्य- कु. गंधार ढवळे यांची तेवढीच सुंदर साथ मिळाल्यामुळे सुरेल मैफिलीची रंगत अजूनच वाढली. उत्तम ध्वनी योजना रवींद्र मेघावत यांची होती.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीरंग च्या विनय कशेळकर, दिपक आपटे, सौ. सीमा आवटे, श्रीकांत चेपे (छायाचित्रण) सुहास धस, काशिनाथ निंबळे,सुनील वाघमारे, विश्वास देशपांडे,रुपाली जवेरी (रांगोळी), डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ.किरण देशमुख, संजय साने आणि सर्व विश्वस्त मंडळ सदस्यांचे मोलाचे सहाय्य होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!