ताज्या घडामोडी

राज्य सरकारी कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., सातपूर,नाशिक-१२ च्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलला घवघवीत यश

Spread the love

राजेंद्र ना.भावसार विजयी.

राज्य प्रतिनिधी – डॉ.सुनील भावसार.

 १८ जानेवारी बुधवार रोजी नाशिक येथी सातपुर, अशोकनगर परिसरातील जवळपास ३०० बंगले असलेल्या सर्वात मोठी “राज्य सरकारी कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.” या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक शांततेत पार पडली. मतदाना नंतर लगेच मतमोजणी करण्यात आली. निवडणूक झालेल्या १४ पैकी १३ जागांवर प्रगती पॅनलचे उमेदवार भरघोस मताने विजयी झालेत. प्रगती पॅनलचे नेते व विद्यमान चेअरमन श्री.अशोक रावबा रौंदळ यांचे सह पुढील उमेदवारांचा विजय झाला.
१] श्री.अशोक रावबा रौंदळ
२] श्री.बाळासाहेब बापुजी भोजणे
३] श्री.राजेंद्र नारायण भावसार
४] श्री.बाळासाहेब बारकू जाधव
५] श्री.किरण बाळासाहेब बोरसे
६] श्री.लखुजी वनाजी महाजन
७] श्री.बारकु ताराचंद वाघ
८] श्री.लक्ष्मण शार्दुल विभांडीक
९] श्री.बाळु रामभाऊ शिंदे
१०] श्री.लोटन शंकर सोनवणे
११] श्री.सागर दिलीप भंदुरे
१२] श्रीमती छाया मधुकर दिक्षित
१३] श्री.विजया सुरेश हिरवे.
प्रगती पॅनेलच्या या घवघवीत यशाचे श्रेय पॅनेलचे नेते श्री.रौंदळ आणि श्री.भोजणे यांचे असल्याचे विजयी उमेदवारांनी सांगितले तर ही श्री.रौंदळ आणि श्री.भोजणे यांनी केलाल्या चांगल्या कामाची सर्व मतदार सभासदांनी दिलेली पावती असल्याचे मनोगत श्री.राजेंद्र भावसार यांनी व्यक्त केले.
विजया नंतर प्रगती पॅनलच्या विजयी उमेदवारांनी विजयी मिरवणुकीचे ऐवजी संपूर्ण राज्य कर्मचारी वसाहतीत “आभार फेरी” काढून मतदार सभासदांचे आभार मानले. विजयी उमेदवारांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले, तर महिलांनी औक्षण करून त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!