ताज्या घडामोडी

गवळी सेवा फाऊंडेशन चा “माझी दिनदर्शिका२०२३”प्रकाशन सोहळा युवा खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

Spread the love

ठाणे/राजेश चौकेकर: गवळी सेवा फाऊंडेशन रजि. महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी “माझी दिनदर्शिका २०२३” गवळी सेवा फाऊंडेशन या गवळी समाज बांधवांच्या न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या आणि समाज बांधवांच्या विकासाचे ध्येय बाळगत एकीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थेचा “माझी दिनदर्शिका २०२३” प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी ठाणे येथे मुख्यमंत्री सुपुत्र सन्मानिय खासदार श्री श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते मोठया उत्साहात संपन्न झाला.
“माझी दिनदर्शिका २०२३” या सामाजिक संस्थेच्या दिनदर्शिका साठी जाहिरात देणाऱ्या सर्व समाजबांधव व हितचिंतकांचे गवळी सेवा फाऊंडेशन परिवाराकडून मनःपूर्वक आभार व धन्यवाद..!
असे मनोगत यावेळी संस्थापक श्री दिनेश जी भोजने अध्यक्षीय भाषणात मांडले.यावेळी संस्थेचे मार्गदर्शक मा.नगरसेवक, शिवसेना उपशहरप्रमुख ठाणे मा.श्री प्रदीप(भाई) खाडे साहेब, श्री मधूकरजी लोखंडे साहेब, संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश सुरेश भोजने, समाजसेविका सौ.दिक्षाताई दिनेश भोजने, सौ.आस्था शशिकांत ठसाळ, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शशिकांत शिवराम ठसाळ, श्री. मयुर प्रकाशराव येवले, सौ.धनिशा मयुरराव येवले, कु.पुजा के चौधरी, कु. मंगेश शिवराम ठसाळ, सौ.प्रणाली अमित खताते, समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!