महाराष्ट्र

रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मनसे-भाजप यांच्यातील वाढत्या जवळीकीविषयी नापसंती व्यक्त केली.

भाजपने राज ठाकरे यांच्यासोबत युती केल्यास त्या भूमिकेला तडा जाईल, असे आठवले यांनीम्हटले आहे.

Spread the love

सांगली भाजपच्या मित्रपक्षांपैकी एक असणाऱ्या ‘रिपाई’चे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मनसे-भाजप यांच्यातील वाढत्या जवळीकीविषयी नापसंती व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच युती भाजपला महागात पडेल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार चालतात. पण भाजपने राज ठाकरे यांच्यासोबत युती केल्यास त्या भूमिकेला तडा जाईल, असे आठवले यांनी म्हटले आहे. ते सांगलीच्या आटपाडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा भाजपला मनसेशी युती करण्याची काहीही गरज नसल्याचे सांगितले. मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही.

महाराष्ट्रात भाजप आणि आरपीआय सत्तेत येईल आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करणे हीच आमची भूमिका असल्याचे आठवले यांनी सांगितले. रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. सगळ्या मुस्लिमांना त्रास देण्याची बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नव्हती. त्यामुळे राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत. बाळासाहेबांची कॉपी करणे एवढं सोप काम नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!