ताज्या घडामोडी

चर्चा तर होणारच!! क्रिकेट स्पर्धेत बक्षीस म्हणून मानाचा बोकड आणि कोंबडा – कोंबडी..

Spread the love

चरण प्रीमियर लीग मधील अनोख्या बक्षिसाची शिराळा तालुक्यात जोरदार चर्चा…

आजपर्यंत आपण अनेक क्रिकेट स्पर्धा पाहिल्या असेल त्या मध्ये रोख रक्कम विजेत्याला दिली जाते. पण सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चरण गावात अजब- गजब बक्षिसाची चर्चा सुरू आहे. ते म्हणजे प्रथम क्रमांकासाठी एक मानाचा बकरा तर द्वितीय क्रमांकासाठी पाच कोंबडे आणि तृतीय क्रमांकासाठी पाच कोंबडी ठेवल्या आहेत. या बक्षिसाची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.
शिराळा तालुक्यातील चरण गावात चरण प्रीमियर लीग आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत फक्त गावातील आठ संघ निवडले जातात यावर्षी स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. मात्र तरुणांनी अजब बक्षीस ठेवलेने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. ही स्पर्धा सात आणि आठ मे रोजी पार पडणार आहे. पण त्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
चरण प्रीमियर लीग हा एक जिव्हाळ्याचा विषय असं समजून तरुणांनी चरण प्रीमियर लीग सुरू केली आहे. गेल्यावर्षी मैदानात अनेक जुन्या खेळाडूंनी आपला खेळ दाखवला या वर्षीही क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी प्रथम क्रमांकासाठी 11 हजार 111 रुपये चषक आणि मानाचा एक बकरा ठेवला आहे. द्वितीय क्रमांकासाठी 7777 रुपये आणि चषक त्याचबरोबर पाच कोंबडे बक्षीस ठेवले आहे तर तृतीय क्रमांकासाठी 5555 रुपये चषक आणि पाच कोंबडी असे बक्षीस ठेवले आहे या स्पर्धेत साखळी पद्धतीने सामने खेळविले जातील स्पर्धेची तारीख जाहीर झाल्यापासून पुन्हा चर्चा सुरु झाली आहे ही स्पर्धा घेण्यासाठी गावातील अनेक तरुण मुंबई-पुणे होऊन गावी परत येत आहे. गेल्या वर्षी अंतिम टप्प्यातील सामने अधिक रोमांचक झाले होते. त्यामुळे अनेक जण यंदाचा चरण प्रेमियर लीग ची वाट पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!