आरोग्य व शिक्षण

आंबी ते शेटेवस्ती २५ लाख रुपयांच्या रस्त्याचं भूमिपूजन संपन्न

Spread the love

आंबी : आज (दि.5) रोजी आंबी ते शेटेवस्ती रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले. मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या खासदार निधीमधून २५ लाख रुपयांच्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचं भूमिपूजन मावळ तालुका प्रमुख राजु खांडभोर यांच्या हस्ते, सरपंच संगीता घोजगे यांच्या उपस्थित करण्यात आले.

यावेळी बोलताना खांडभोर म्हणाले, खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून या रस्त्याचे काम होत आहे. येथील ग्रामपंचायतीत शिवसेनेचा एकही सदस्य नसताना कोणतेही राजकारण न करता निस्वार्थी भावनेने आम्ही काम करीत आहोत. यावर्षी मावळला पाच कोटींचा निधी खासदारांच्या माध्यमातून आणला आहे.मावळ तालुक्यात सर्वात जास्त निधी या ग्रामपंचायतीसाठी खर्च केला असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी तळेगाव दाभाडे मुख्य शहर प्रमुख दत्तात्रय भेगडे, उपसहरप्रमुख अमोल, शिवकुमार कोणलिकार, अप्पा गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते समीर जाधव व वडगाव शहर प्रमुख प्रशंत ढोरे, ग्रामपंचायत सदस्य बायडाबाई घोजगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!