आरोग्य व शिक्षण

अति दुर्गम भागातील भांबर्डे येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास झाला सुखकर

Spread the love

भांबर्डे : आज गुरुवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी  नाईट फ्रँक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्याकडून संपर्क संस्थेच्या संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे तालुका मुळशी जिल्हा पुणे शाळेला शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस अर्पण करण्यात आली. या स्कूल बस मुळे भांबर्डे परिसरातील वीस किलोमीटरवरील अंतरातील विद्यार्थ्यांची पायपीट आता थांबणार आहे. नाईट फ्रँक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून विद्यालयाच्या सांस्कृतिक हॉल व शाळा इमारती वरील पत्रे बदलण्यात आली असून वस्तीगृहातील निवासी असणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक लॉकर्स कपाट देण्यात आली आहे.

याप्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून प्रकल्पातील सर्व महिला कर्मचारी व शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली.

या कार्यक्रमासाठी मा.श्री. शिशिर बैजल साहेब (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नाईट फ्रँक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी), मा.सौ. साधना बैजल मॅडम,मा.श्री. अमित कुमार बॅनर्जी (संस्थापक,सचिव संपर्क संस्था) मा.श्री. अनुज कुमार सिंग (सीईओ संपर्क संस्था) मा.श्री. निशिध उपाध्याय (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ह्युमन रिसोर्स) मा.श्री. श्रीराम कुमठेकर (ज्येष्ठ पत्रकार लोणावळा) मा.सौ. नवनिता चटर्जी (सीनियर प्रोग्राम अॅडव्हायझर, संपर्क संस्था) मा. श्री सतीश माळी (प्रोग्राम मॅनेजर, संपर्क संस्था) मा.श्री. दत्ताभाऊ दिघे (उपसरपंच, भांबर्डे) माननीय श्री नितीन डुके (ग्रामसेवक, भांबर्डे) मा.श्री एकनाथ दिघे, मा. श्री गोविंद सरूसे, मा.श्री. जयराम दिघे, मा.श्री. श्रीराम वायकर, (सर्व मा.सरपंच भांबर्डे) मा.श्री विनायक कोकरे (मा.सरपंच वांद्रे) मा.श्री. संतोष गोरे (पोलीस पाटील पिंपरी) मा.श्री तानाजी दिघे, अंकुश दहिभाते, किसन दिघे (सामाजिक कार्यकर्ते) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेच भांबर्डे, गोठे, आडगाव, आहिरवाडी तैलबैल, कदम बारपे इत्यादी धरणग्रस्त भागातील पालक मंडळी बहुसंख्येने व नाईट फ्रँक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उच्चस्त पदाधिकारी, संस्थेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कंपनीचे अध्यक्ष मा. श्री शिशिर बैजल साहेब यांनी आपल्या भाषणातून “संपर्क संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील करीत असलेल्या आदिवासी मुलांसाठीच्या कामाचे कौतुक केले. भविष्यात संस्थेस मदत करण्याचे आश्वासन दिले.”

सर्व मान्यवरांचे स्वागत मा.श्री.अमित कुमार बॅनर्जी यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दत्तात्रय चाळक मुख्याध्यापक, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रफिक पठाण सहशिक्षक व सर्वांचे आभार श्री. हिरामण कोकणे सहाय्यक प्रकल्पअधिकारी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!