ताज्या घडामोडी

अभ्यासातील सातत्य व एकाग्रता यशाचा राजमार्ग : प्रा.शशिकांत काटे

Spread the love

नवे पारगाव : सदृढ शरीर, अभ्यासातील सातत्य व एकाग्रता आपल्याला यशाचा राजमार्ग दाखवितो म्हणून विद्यार्थ्यांनी एकाग्र होऊन अभ्यास करावा व यशाला गवसणी घालावी असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक प्राचार्य शशिकांत काटे यांनी केले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित अंबप (ता.हातकणंगले ) येथील राजेंद्र हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी प्राचार्य शशिकांत काटे बोलत होते. प्रभारी मुख्याध्यापक के. बी. शेटे अध्यक्षस्थानी होते.
विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक व जिमखाना प्रमुख दिलीप चरणे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्राचार्य शशिकांत काटे, पाराशर हायस्कूलचे जिमखाना प्रमुख बाबासाहेब करवडे प्रभारी मुख्याध्यापक किरण शेटे आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
नवनाथ शेरखान, रवींद्र सूर्यवंशी, बाबासाहेब करवडे, मुख्याध्यापक किरण शेटे यांची भाषणे झाली. सुनील कावळे, शिवाजी सनगर, भारती पाटील, दिलीप पाटील, मुकेश पाटील, सुषमा पाटील, सुनील कांबळे, राजेंद्र दाभाडे उपस्थित होते.
जिमखाना प्रमुख दिलीप चरणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भारती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.नवनाथ शेरखाने यांनी आभार मानले. अंबप (ता.हातकणंगले) येथील राजेंद्र हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण करताना संस्थेचे आजीव सेवक प्राचार्य शशिकांत काटे. बाबासाहेब करवडे, के. बी. शेटे आदी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!