अध्यात्मिकआपला जिल्हामावळ

पुरूषोत्तम मास हा भगवान विष्णू यांच्या नावामुळे अत्यंत पविञ आहे.श्रीमंत. रमेशचंद्रजी व्यास.

Spread the love

पुरूषोत्तम मास हा भगवान विष्णू यांच्या नावामुळे अत्यंत पविञ आहे ; श्रीमंत रमेशचंद्रजी व्यास.Purushottam Masa is very sacred because of the name of Lord Vishnu; Shrimant Rameshchandraji Vyas.

आवाज न्यूज :  मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, १४ ऑगष्ट..

पुरूषोत्तम मास हा भगवान विष्णू यांचे नावामुळे अत्यंत पविञ आहे. या महिन्यात केलेले दान त्यातही अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे, मृत्यूनंतर स्वर्गात जाण्यासाठी अन्नदान केलेले उपयोगाला येते. सलग तीन वर्षे अकरा दिवस वाढतात, त्यामुळे एक जादा महिना तीन वर्षांनी येतो , त्यालाच आधिक मास म्हटले आहे.या महिन्यात सर्वात जास्त सण, उत्सव येतात, असे उद्योजक श्रीमंत रमेशचंद्रजी व्यास यांनी मार्गदर्शन करताना भाषणात सांगितले.

मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचे वतीने पुरूषोत्तम मास, आधिक मास ग्रंथाचे निरूपण कार्यक्रमाचे समारोप प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काशी येथील महान साधू उपस्थित होते. मावळ पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम कदम, मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे खजिनदार भरत येवले, कार्याध्यक्ष संतोष कुंभार , तसेच मनोज भाऊ ढोरे , प्रवक्ते सुनिल महाराज वरघडे आदि उपस्थित होते.

यावेळी व्यास म्हणाले , ” आपण गाईला एक पेंढी खाऊ घातली तरी ते एक ट्रकभर चारा घालण्यापेक्षा सर्व श्रेष्ट आहे, फक्त त्यात सातत्य हवे.तर पुण्यसंचय होऊन तुमच्या घरातील अडचणी , कमी होतात. मृदूंगाचा आवाज कसातरी वाजला, तर त्याला पीठाचा गोळ्याचा घास भरवला , की तो तालात वाजतो.तसेच दान करण्यासाठी श्रीमंत असलेच पाहिजे असे नाही. एखाद्या व्यक्तीला आजारपण व संकटात मदत केली, एखाद्या तरूणाचे पाठीवर शाबासकीची थाप टाकली तर त्याचे जीवन जगण्यासाठी त्याला नवी उर्मी येते. माञ आपल्या कुवतीनुसार दान करावे , पूर्वी राजा हरिश्चंद्र , महारथी कर्ण , शिबीराजा , बळीराजा यांनी अतिरेक केला व आपल्या कुवतीपेक्षा जास्त दान केल्याने त्यांचा नाश झाला,असेही व्यास यांनी सांगितले.

यावेळी व्यास म्हणाले मराठा आरक्षण करीता आझाद मैदानावरील छञपती संभाजीराजे यांचे उपोषणास पाठिंबा , रायगड किल्यावर शिवराज्यभिषेकदिन ३५० वा साजरा करण्यास गेलो. कार्तिकी वारीनिमित्त पायी वारकरी दिंड्यांना अन्नदान व स्वागत बालसंस्कार शिबीर असे उपक्रम व अधिकमासाचे निमित्ताने ग्रंथाचे निरूपण असे मावळ तालुका वारकरी मंडळाने साजरे केले आहेत, हे कौतुकास्पद आहे.
श्री साई मंदिरात ग्रंथ समाप्तीनीमित्त पूजा, भजन व श्री.विष्णु अवतार श्रीविठ्ठलाचे प्रतिमेची पुष्पहार घालून पूजा व दिप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती शांताराम कदम व उद्योजक संतोषमहाराज कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.ह.भ.प. नाथामहाराज शेलार यांनी दान केल्याचे पुण्य अगणित असते ते सोदाहरण सांगितले.यावेळी गणपतराव पवार , शांताराम लोहर , बाळासाहेब देशमुख , मृदूंगमणी भिवाजी गायखे , सागर मापारी , प्रवचनकार भाऊ मापारी , सोमनाथ सावंत , दिपकभाऊ वारिंगे , तसेच नंदकुमार भसे यांचे बंधू माजी सरपंच नामदेव भसे,  तानाजी भसे , निवृत्ती भसे , मंडळाचे कोषाध्यक्ष बजरंग घारे , सचिव रामदास पडवळ , रामनाथ शेटे , एकनाथ भानुसघरे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. पंढरपूर येथील पायी पालखी याञेनिमित्त आरोग्य विभागाचे चांगले काम केल्याबद्दल ह.भ.प.राजाराम असवले यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच दिपक वारिंगे यांच्या कन्येने चांगले कार्य केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष. नंदकुमार भसे यांनी केले. सूञसंचालन घारे यांनी केले, तर आभार कायदेशीर सल्लागार सागर शेटे यांनी मानले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!