ताज्या घडामोडी

शासनाकडून गेले अनेक वर्षे मणदूर धनगर वाडा, विनोबा ग्राम, खुंदलापूर , जानाईवाडी (ता शिराळा) येथील नागरिकांचे प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेमुळे स्वतंत्र दिनादिवशी 26 जानेवारीला आंदोलन होणार?…..

Spread the love

शिराळा -:
मणदूर धनगरवाडा, विनोबा ग्राम येथील रहिवाशांना त्यांच्या जमिनी परत करण्यासाठी मा. राज्यपाल व जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाने केलेल्या आदेशाची वन अधिकारी यांच्याकडून पायमल्ली केली असल्याचे व खुंदलापूर, जाणाईवाडी येथील गावचा पुनर्वसनाचा प्रश्न जाणून बुजून वन विभागाकडून दिरंगाई केली असल्यामुळे सामान्य माणसांना दिलासा मिळण्यासाठी या देशांमध्ये घटना निर्माण झाली आहे परंतु या ठिकाणच्या नागरिकांना मात्र त्यांच्या प्रश्नासाठी आज स्वातंत्र्य मिळून 70 ,75 वर्षे झाली तरी झगडावे लागत आहे ही फार मोठी शोकांतिका आहे . शासनाचे अधिकाऱ्याकडून गेले अनेक वर्षे हा प्रश्न जाणून बुजून प्रलंबित ठेवत असल्याने खुंदलापूर, मणदूर (धनगरवाडा) जानाईवाडी येथील ग्रामस्थ महिला आपल्या लहान मुलासह दिनांक 26 जानेवारी रोजी एकत्रित येऊन न्याय मागणीसाठी मणदूर येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करून झेंडा फडकवून वारणावती येथील वन्यजीव कार्यालयासमोर आंदोलन करून उपोषणास बसणार आहेत अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती हणमंतराव पाटील, तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील, मणदूर सरपंच वसंत पाटील,उकुळ सरपंच राजाराम मुठल, गुढे सरपंच सखाराम दुर्गे, सोनवडे सरपंच रवी यादव माजी उपसभापती एन डी लोहार, प्रकाश जाधव,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

मणदूर धनगर वाडा विनोबा ग्राम येथील नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न गेले अनेक वर्षे प्रलंबित असून जमिनीची फाळणी न झालेने सातबारा वरती सरकार व फॉरेस्ट चे नाव असल्याने शेती विकसित करण्यासाठी, घर बांधण्यासाठी, वारस नोंदणी, घरकुल योजना, शेती करजासाठी व शासकीय योजनेचे कोणतेही लाभ या ठिकाणच्या नागरिकांना घेता येत नाही. शिवाय अतिवृष्टीने होणारे पिकांचे नुकसान भरपाई या नागरिकांना मिळत नाही. त्याचबरोबर खुंदलापूर या गावचा चांदोली व्याघ्र प्रकल्पामध्ये समावेश असून या गावचे पुनर्वसन करण्यासाठी 1995 पासून शासनाकडे प्रश्न प्रलंबित आहेत. या लोकांना यतगाव (ता. कडेगाव) येथील नागरिकांना शासनाकडून जमीन दाखवण्यात आली होती. ती ग्रामस्थांनी जमीन मान्य केली. परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पुनर्वसन होत नाही . व या ठिकाणी त्यानां फॉरेस्ट विभागाकडून त्रास होत आहे. असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने या ठिकाणच्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 2012ला जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसन कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करणे असे योग्य ते निर्बंध देऊनही अधिकाऱ्यांच्या कडून यासंबंधी फार मोठ्या प्रमाणात टाळाटाळ होत आहे. याचा निषेध म्हणून व आमच्या मागण्या मान्य होत नसल्याने मणदूर धनगरवाडा, खुंदलापूर, जानाईवाडी येथील नागरिक 26 जानेवारी या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हुतात्मा स्मारक मणदूर येथे अभिवादन करून वारणावती येथील वन्यजीव कार्यालयासमोर कोरोनाचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!