ताज्या घडामोडी

मराठी शाळा टिकवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त, वागेश कदम यांचे प्रतिपादन, पालघर मध्ये विद्यार्थी घेणार आधुनिक तंत्रज्ञानाचे घडे, पहिल्या इनोव्हेटिव्ह लॅबरोटरी चे उद्घाटन

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.१४
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबरच मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययन आणि अध्यापन केल्यास मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची रोडावत असलेली संख्या निश्चितच वाढेल असा विश्वास जीवन विकास संस्थेचे कार्याध्यक्ष वागेश कदम यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या पुढाकाराने पालघर येथील स तू कदम विद्यालय मध्ये अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचा संगणक कक्ष नुकताच सुरू करण्यात आला. सुमारे पन्नास लाखांपेक्षा अधिक खर्च करून उभारलेल्या या संगणक कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना वागेश कदम यांनी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण घेण्यासाठी या संगणक कक्षाचा निश्चितच उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त करून रोटरी क्लबचे आभार व्यक्त केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले उद्योजक योगेश महानसारिया यांनी टेक्नॉलॉजी खूप झपाट्याने बदलत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट हा आपल्या दैनंदिन जीवनावर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. कम्युनिकेशन, हेल्थकेअर, एग्रीकल्चर, होम सिक्युरिटी, होम अप्लायन्सेस या सर्वांमध्ये टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे. प्रत्येक टप्प्यावर नव नवीन टेक्नॉलॉजीची आवश्यकता असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना निश्चितच हा कक्ष महत्त्वाचा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तर इलेक्ट्र डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप अग्रवाला यांनी पालघर हा बहुल आदिवासी जिल्हा असून जिल्ह्यातील पहिला अत्याधुनिक संगणक कक्ष जिल्ह्यात सुरू करण्यात असून अजून चार संगणक कक्ष निर्माण करायचे आहेत. सध्या इंडस्ट्री मध्ये कौशल्य असलेल्या लोकांची गरज आहे आणि कॉलेजमधून जी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेली मुले यांच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी ही आयटी इनोव्हेशन लॅबरोटरी उपयुक्त ठरेल असे सांगितले.

याप्रसंगी प्रकल्प समन्वयक तथा डिस्ट्रिक असिस्टंट गव्हर्नर भगवान पाटील यांनी या संगणक कक्षामध्ये रोबोटिक्स, थ्री डी प्रिंटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT), डेटा सायन्स हे कोर्सेस उपलब्ध आहेत. शाळेतील मुलांसाठी ते पूर्णपणे मोफत आहेत. ह्या कोर्सेसची इंडस्ट्रीमध्ये सध्या खूप मागणी आहे. हे सर्व कोर्सेस सध्या इंजीनियरिंग लेव्हल ला शिकवले जातात. परंतु या संगणक कक्षामध्ये हे विषय सातवी, आठवी आणि नववी ची मुलं सुद्धा शिकतील असे सांगितले.

यावेळी रोटरी क्लब बॉम्बे अध्यक्ष शरणाज वकील,रोटरी क्लब पालघर अध्यक्ष दीपेश ठाकूर, इनरव्हील क्लब अध्यक्ष स्वाती पाटील, प्रशांत पाटील, अमित पाटील, रोटरी क्लबचे आजी-माजी पदाधिकारी, पालघर जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय राऊत, पालघर तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील,शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण शिंदे, पर्यवेक्षक रवींद्र नाईक, विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

या अत्याधुनिक संगणक कक्षामध्ये परिसरातील वेगवेगळ्या शाळांमधील इयत्ता सातवी ते नववी चे विद्यार्थी विनामूल्य अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!