ताज्या घडामोडी

सरस्वती विद्यालय फणसपाडा चा २२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

प्रमोद पाटील

पालघर जिल्हा प्रतिनिधी दिनांक १९
वैतरणा येथील फणसपाडा सरस्वती विद्यालयाचा २२ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेघराज शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंदुलाल घरत उपस्थिती होते. घरत यांनी विद्यालयाने केलेल्या प्रगतीचा तसेच संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थी व पालकांना व्यवसाय निवड व व्यवसाया संबंधी उपलब्ध संधींचे तसेच दहावी व बारावीनंतर विविध कोर्सेस साठी आवश्यक असलेल्या प्रवेश परीक्षा व दाखले इत्यादींची माहिती विवा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी विरार येथील तज्ञ मार्गदर्शक अतुल पवार व स्वप्नील वर्तक यांनी देऊन पालकांच्या विविध शंकांचे निरसन केले.

या दिनाचे औचित्य साधून वैतरणा परिसरात कोरोना काळात वैद्यकीय,अन्नधान्य व इतर मदत कार्य करणाऱ्या सेवाभावी डॉक्टर्स व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डी .के. पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना शिक्षण व आरोग्य इत्यादी चे महत्व सांगून मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता किणी यांनी विद्यालयाच्या २२ वर्षातील कारकिर्दीचा व प्रगतीचा आढावा सादर केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील व निकिता म्हात्रे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!