ताज्या घडामोडी

इस्लामपूर शहर शिवसेनेचा तहसिल कार्यालय समोर शंखध्वनी

Spread the love

पालिका प्रशासकाचा शंख ध्वनी करत निषेध…

आज सोमवार दी.११/०४/२०२२रोजी तहसिल कार्यालय समोर शहरशिवसेने च्या वतिने शहर प्रमुख शकिल सय्यद याचें नेत्रुत्वाखालि जोरदार शंख ध्वनी करत पालिका प्रशासकाचा जाहीर निषेध करण्यात आला.

 

यावेळी पालिका प्रशासकाचा धिक्कार असो, नहीं. चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा अशा जोरदार घोषणाबाजी करत परीसर दणाणुन सोडला यावेळी जोरदार शंख ध्वनी करण्यात आला

यावेळी बोलताना सय्यद यांनी पालिका प्रशासनाचा कारभाराची जिल्हाधिकारी यांनी चोकशि करावी ,आज शहर व उपनगरात घरपट्टी पाणीपट्टी ची वसुलि ही पठाणि पद्धतिने सुरू आहे ती थांबवुन तोडलेले नळ कनेक्शन सत्वर जोडावित आणि घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी चे हाप्ते पाडुण द्या अन्यथा हे आंदोलन अखंड सुरू राहिल असा इशारा यावेळी सय्यद यांनी दीला
मा.तहसिलदार दारसो प्रदीप उबाळे यांनी पालिका प्रशासक मा.वैभव साबळे यांचे वर फोन वर चर्चा केली असता शिवसेना शिष्टमंडळा सह कार्यकर्ते नां पालिकेत पाठवा मी चर्चे स तयार आहे तहसिलदार साहेबानिं आमची आणि प्रशासकाचि चर्चा घडवुन आणली प्रशासकाच्या चर्चेत सय्यद आपल्या मागण्या वर ठाम राहिले मुळे शेवटी प्रशासक तथा मुख्य अधिकारी वैभव साबळे यांनी जे मालमत्ता धारकथकित आहेत अशा सर्व घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी दारांना ३१जुलै अखेर या थकबाकि दारांनी दोन टप्प्यांत आपली थक बाकी भागवावी असा शब्द दीला आहे हे शिवसेनेचे मोठे यश असल्याचे सय्यद म्हणाले
यावेळी सागर मलगुडें, तालुका प्रमुख युवा नेते उमेश पवार, अंकुश माने ,राजु पठाण उप प्रमुख, सुर्यकांत पाटील परशुराम बामणे, तात्यासाहेब बामणे,अशोक चव्हाण,दीपक जाधव, सागर भोजुगडे रामराव थोरात डाॅ.सचिन पाटील,गणेश उजंबळे,रोहीत जाधव विनोद शेवाळे प्रथमेश काटे,प्रितम काळे अनंत नाईक ,विलास नाईक, विकास पवार योगेश हुबाले आदी.शिवसैनिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!