राजारामबापू इन्स्टिट्युट साखराळे,येथे आंतर महाविद्यालयीन स्पर्धा संम्पन्न
शिराळा प्रतिनिधी
साखराळे (ता. वाळवा) येथील कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या राजारामबापू इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, साखराळे या अभियांत्रीकी महाविद्यालयात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील आंतर-महाविद्यालयीन स्पर्धा INSPIRA-2K22 पार पडली. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व विराज ग्रुप ऑफ इन्डस्ट्रीजचे अध्यक्ष विराज नाईक होते. जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते फित कापून व दिपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभात जिल्हाध्यक्ष नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रोग्रॉम कन्टक्टर प्रोफेसर अवधूत कुंडले, बी. बी. ए. विभागप्रमुख डॉ. प्रतिभा ए. जगताप, इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शशिकांत चव्हाण, एम. बी. ए. विभागप्रमुख डॉ. हेमलता गायकवाड, प्रभारी संचालक डॉ. एस. एस. जाधव, विद्यार्थी विकासाचे डीन डॉ. एल. एम. जुगुळकर, विद्यार्थी समन्वयक साहिल वालीकर व विद्यार्थी उपस्थित होते.