ताज्या घडामोडी

कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या स्थानिक विकास निधीमधून रत्नागिरी जिल्ह्यातील २४३ माध्यमिक शाळांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम संपन्न.

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या आमदारांचा स्थानिक विकास निधी मधील ६० लाख रुपये इतक्या निधीमधून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध २४३ माध्यमिक शाळांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पार पडला.यावेळी चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम,माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद किर,रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे,अविनाश लाड माजी उपमहापौर मुंबई मनपा,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत खताते,राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी,चिपळूण पंचायत समिती सदस्या पुजाताई निकम आदी मान्यवर उपस्थित होते.शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी आपल्या भाषणात, कोकण शिक्षक विभाग मतदारसंघाची व्याप्ती खूप मोठी असून पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असून कोकण शिक्षक मतदारसंघातील शाळा आणि शिक्षकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणेकरिता कटिबद्ध आहे असे सांगितले. विधिमंडळात शाळा आणि शिक्षक यांचे प्रश्नाकरिता नेहमी आवाज मी उठविला आहे.शाळांच्या समस्या सुटणे करिता आमदार निधी कमी पडला म्हणून खासदार निधी तसेच इतर आमदारांचा निधी वापरून या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला.रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा व शिक्षक यांचे प्रश्नांचा निपटारा करणेकरीता अधिकाधिक निधी देणेबाबत माझा मानस आहे,असे मत आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले.आमदार शेखर निकम यांनी आपल्या भाषणात,शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना शिक्षक मतदारसंघातील प्रश्न तळमळीने शासन दरबारी मांडून त्याचा विहित वेळेत निपटारा करणे करिता नेहमी आमदार बाळाराम पाटील यांचा खटाटोप असतो.रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक आणि शाळा यांचे प्रश्न आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रयत्नाने नक्कीच सुटतील,असे मत माजी शिक्षक आमदार श्री.सावंत यांनी व्यक्त केले.शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या सारखा प्रामाणिक व कार्यतत्पर शिक्षक आमदार कोकण विभागास लाभला या माध्यमातून शिक्षक मतदारसंघातील शैक्षणिक प्रश्न नक्कीच सुटतील असा विश्वास माजी आमदार सावंत यांनी व्यक्त केला.यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार बाळाराम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!