आरोग्य व शिक्षण

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित

Spread the love

पुणे : पुणे जिल्हा दूध संघावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता‌ आली आहे.पंचवार्षिक निवडणूकीत 16 पैकी 15 जागा मिळवून राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.संघातील 16 पैकी 5 संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.

गोपाळराव म्हस्के (हवेली), भगवान पासलकर (वेल्हे), राहुल दिवेकर (दौंड) आणि अनुसूचित जाती-जमाती गटामधून चंद्रकांत भिंगारे हे चार राष्ट्रवादीचे संचालक आहेत. पुरंदरमधून बिनविरोध निवडून आलेले मारुती जगताप हे काँग्रेस पक्षाचे आहेत. सहकार पॅनेलने पुरस्कृत केले होते. तर 11 जागांसाठी 25 उमेदवार रिंगणात होते.

भोरमधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार दिलीप थोपटे वगळता राष्ट्रवादीकडून घोषित सहकार पॅनेलने सर्व जागा जिंकल्या आहेत.पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकत दूध संघावर पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.

यामध्ये विद्यमान अध्यक्ष विष्णू हिंगे आणि विद्यमान उपाध्यक्षांचे पती कालिदास गोपाळघरे विजयी झाले आहेत. जिल्हा दूध संघासाठी रविवारी (दि. 20) मतदान (Voting) झाले आणि सोमवारी (दि. 21) सकाळी मतमोजणी झाली. कात्रज मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी ही मतमोजणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!