आरोग्य व शिक्षण

भोसरी येथील क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने औद्योगिक सुरक्षा सप्ताह संपन्न

कामगारांनी घेतली सामुहिक सुरक्षितता प्रतिज्ञा

Spread the love

चिंचवड : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे व पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटरमध्ये पुणे शाखेच्या वतीने राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह 2022 साजरी करण्यात आले.

राज्यभरातील 22 उद्योग समुहातील 107 संघांनी औद्योगिक व रस्ते वाहतूक सुरक्षितता बाबतीत काम करताना वाहन चालविताना श्रद्धा व निष्ठा ठेवू सुरक्षितता नियमाचे व सुचनाचे काटेकोर पालन करू, कुटूंबीयांच्या उद्योग संस्थेच्या समाजाच्या हितासाठी अपघात न होण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची सामुहिक शपथ घेतली. तसेच औद्योगिक स्तरावर विविध उद्योगसमुहाची भित्तीपत्र, प्रश्नमंजूषा, औद्योगिक क्षेत्रात जनजागृती व्हावी, यासाठी नाटीका, प्रबंध सादरीकरण, श्लोगन यास्पर्धाचे दिवसभरात दोन सत्रात संपन्न झाल्या.

त्यात औद्योगिक क्षेत्रात काम करताना प्रत्यक्ष काम करताना घ्यावयाची काळजी व सुरक्षितता याबाबत चित्रे, स्लोगन व प्रबंध परिक्षकांसमोर सादर केले. सहभागी संघांतील स्पर्धकांनी नाटीका स्पर्धेत नाटीका सादर करताना उद्योग संस्थेत मशीनवर काम करताना हेल्मेट, चष्मा, शरीर आवरण, हातमोजे, बुट घालणे. उद्योग संस्थेतील उष्ण भट्टीवर काम करताना सेफ्टीचे उपकरण वापरणे. उद्योग समूहातील वस्तू, उपकरणे, हत्यारे काळजीपूर्वक वापरली जावीत चांगल्या कामाची सवय अंगिकारावी ठरविलेल्यी पद्धतीनेच काम सजगपणे अपघात होणार नाही, याची दक्षता घेत त्याचप्रमाणे वस्तूची मांडणी कशी करावी, शिस्त पाळणे, अनावश्यक काम टाळणे, याबाबत जगजागृती व प्रबोधन उपस्थितांसमोर सादर करण्यात आले.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह स्पर्धेचे उद्घाटन शाखेच्या कौन्सिल सदस्या परवीन तरफदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विविध उद्योग समुहातील सांघिक व वैयक्तिक विजेत्यांना गोल्ड व सिल्व्हर मेडल फोरमचे कौन्सिल सदस्या परवीन तरफदार, डॉ. अजय फुलंबरकर, विजयकुमार मोरे, धनंजय वाघोलीकर, रूपेश यादव, प्रकाश यार्दी, माधव बोरवणकर यांच्याहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन कौन्सिल सदस्य अनंत क्षीरसागर यांनी केले. स्पर्धा परिक्षणाचे काम राहूल पाटील, विजयकांत मोरे, अनिल बनकर, धनंजय वाघोलीकर आदींनी पाहीले. कार्यक्रमाचे संयोजन चंद्रशेखर रुमाले, सुनिल वाघ, प्रशांत बोराटे, रहिम मिर्झाबेग यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!