ताज्या घडामोडी

घबकवाडी ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गावातील सर्व महिलांचा सन्मान

Spread the love

घबकवाडी, ता. वाळवा येथील ग्रामपंचायतच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गावातील सर्व महिलांचा गांवचे सरपंच श्री संजय कदम व उपसरपंच सौ. सुरेखा धनाजीराव पवार यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देवून यथोचित सत्कार करण्यात आला.प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेविका सौ. धनश्री पाटील यांनी केले.

यावेळी बोलताना गावचे सरपंच श्री संजय कदम म्हणाले कि, आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देत असताना आनंद होत आहे. आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महिला हातामधील दैनंदिन कामे बाजूला ठेवून. मनमोकळे पणाने गप्पा व हितगुज करण्यासाठी एकत्रीत आल्या. स्वताचे घर, अंगण व परिसर साफ सफाई व स्वच्छता ठेवणे यामध्ये महिला अग्रक्रमाने पुढे असतात. अशाच पध्दतीने महिलांनी समाजकार्यात सहभाग नोंदविला पाहिजे. घरकाम व शेतीची कामे करणे जसे आवश्यक आहे तसे गांवच्या सर्वांगिण विकासासाठीहि आपण नेहमी एकत्रित आले पाहिजे. केंद्र व राज्य सरकारच्या महिला विषयीच्या निरनिराळ्या योजना समजावून घेवून या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशिल रहाणे आवश्यक आहे. गांवचा सरपंच या नात्याने ग्रामपंचायत आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहिल मी आपणास लागेल ते सर्व काही सहकार्य करू, नारी शक्ती महान आहे.जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे संयोजन गावातील सर्वच महिलांनी एकत्रित रित्या केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!