ताज्या घडामोडी

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे 3 रे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न …. !

Spread the love

परळी / प्रतिनिधी
दिल्ली वर्ल्ड स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शनिवार दि . 5 मार्च 2022 रोजी मोठ्या उत्साहात विद्यालयाच्या प्रांगणात सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांना या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपले कलागुण प्रदर्शित करण्यासाठी दिल्ली वर्ल्ड स्कूलने व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री . किरणकुमार गित्ते (IAS त्रिपुरा ) सौ . उषा किरणकुमार गित्ते ( अध्यक्षा , विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटी ) श्री . हिरालाल कराड ( उपशिक्षण अधिकारी बीड ), महाराष्ट्र बेस्ट डान्सरचे विजेते प्रथमेश माने व डान्स महाराष्ट्र डान्स सीजन 1 चे विजेते तसेच डान्स इंडिया डान्सचे सेमी फायनलिस्ट पुण्यकर उपाध्याय आदि मान्यवर उपस्थित होते .

कोव्हिड 19 या कालखंडामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जणसामन्यांची सेवा करणारे खरे कोव्हिड योद्धा जसे की डॉक्टर , नर्स , पोलीस , सफाई कामगार इत्यादी सर्वांना विशेष सन्मान देण्याकरिता हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना कोव्हिडच्या प्रादुर्भावापासून वाचण्या करिता उपाय योजनांचा संदेश देण्यात आला.

तसेच विविध नृत्य, गायन व स्कीट मध्ये जम्बो किड्स, पहिली ते दहावी च्या सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

ऑलिंपिक मध्ये मेडल जिंकून आपल्या देशाचे नाव लौकिक करणारे नीरज चोप्रा व मीराबाई चानू व मायभुमीची रक्षा करताना शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांना विशेष श्रद्धांजली या विषयावर विद्यार्थ्यांनी विविध नृत्य , नाटक , गायन , यांचे सुदंर सादरीकरण केले. कॅप्टन विक्रम बत्रा यांना श्रद्धांजली देण्याकरिता विद्यार्थ्यांनी नृत्य व नाटक सादर करत असताना प्रेक्षक भावुक झाले होते .

कार्यक्रमात प्रथमेश माने व पुण्यकर उपाध्याय यांनी आपल्या विशिष्ट डान्स परफॉर्मन्स तर श्री . किरणकुमार गित्ते व सौ . उषा किरणकुमार गित्ते यांची कन्या कु. श्रिया किरणकुमार गित्ते हिने तिच्या सुंदर गायनाच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले .

यावेळी श्री . किरणकुमार गित्ते साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करताना पालकांना विनंती केली की आपण सर्वांनी आपल्या पाल्यातील सुप्तगुण ओळखुन त्यांना त्या क्षेत्रात वाव देण्याकरिता प्रयत्न करावा असे आव्हान केले .

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री . नितीन देठे सरांनी मांडले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक श्री तेजेशकुमार तुरकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!