आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांना मावळ वार्ता जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला

भारतात पहिल्यादा संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर महा नाट्य सादर करणारे अभिजित कडू व रुपेश दिघे यांचाही सन्मान करण्यात आला

Spread the love

मावळ वार्ता फाउंडेशन प्रस्तुत जगद्गुरू संत तुकाराम महाराजावर आयोजित महानाट्य व मावळ वार्ता गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांना मावळ वार्ता जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला
मावळ वार्ता या व्हिडीओ बातमी पत्राच्या 21व्या वर्धापन दिनी मावळ वार्ता फाउंडेशन व आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने आयोजित जगद्गुरू संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारीत महानाट्य आयोजित करण्यात आले होते या भव्य दिव्य महानाट्य च्या सुरुवातीला हजारो प्रेक्षकाच्या उपस्तिथीत विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मावळ वार्ता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले यामध्ये संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांना मावळ वार्ता जीवन गौरव हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला याच बरोबर आधात्मिक साहित्यकार लेखक डॉ. सदानंद मोरे यांना अध्यात्मिक पुरस्कार,सांस्कृतिक पुरस्कार काव्यमित्र संस्थेचे श्री दीपक सगर यांना शैक्षणिक पुरस्कार मुख्याध्यापक भटु देवरे यांना, कौन्सिल पट्टू पुरस्कार लोणावल्याचे माजी नगरसेवक देविदास कडू यांना, सामाजिक कार्य पुरस्कार विलास काळोखे यांना, पत्रकारीता पुरस्कार सुनील कडूस्कर यांना, विशेष कार्य गौरव पुरस्कार सायली बोत्रे यांना, विशेष कार्य पुरस्कार बाळासाहेब फाटक यांना देण्यात आला
यावेळी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके डॉ. सदानंद मोरे शंकरराव शेळके मावळ वार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष नंदकुमार वालन्ज, संजय अडसूळे, नासीर शेख, किरण गायकवाड, जितेंद्र कल्यानजी, जितेंद्र बोत्रे, नितीन आगारवाल, आशिष बुटाला, नवीन भुरट, संत तुकाराम महाराज
महानाट्य चे दिग्दर्शक अभिजित कडू, रुपेश दिघे,बापूलाल तारे, प्रदीप वाडेकर, सुनील चव्हान व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मावळ वार्ता च्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त मावळ वार्ता पुस्तिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमानिमित्त सोनी टीव्ही चे मालिकेमधील प्रमुख कलाकार प्रफुल्ल सामंत व संत ज्ञानेश्वर यांची भूमिका साकरणारे उपस्तिथ होते यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
भारतात पहिल्यादा संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर महा नाट्य सादर करणारे अभिजित कडू व रुपेश दिघे यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला मावळ तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपस्तीथी लावली होती वारकरी संप्रदाय विशेष करून उपस्तिथ होता कार्यक्रमचे प्रास्ताविक संजय अडसूळे यांनी केले सूत्र संचालन बापूलाल तारे व प्रदीप वाडेकर यांनी तर आभार जितेंद्र कल्यानजी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!