ताज्या घडामोडी

देवळाली प्रवरा हेल्प टीम चे वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

Spread the love

देवळाली प्रवरा – दि. २३ जानेवारी २२
देवळाली प्रवरा हेल्प टीम चे वतीने आज देवळाली प्रवरा येथील आराध्या कॉम्प्लेक्स येथे हेल्प टीम च्या कार्यालयात हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमास हेल्प टीम चे प्रमुख दत्ता कडू पाटील, टीम सदस्य तथा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, टीम सदस्य तथा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका सचिव प्रशांत कराळे, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, सर्वमंथन चे संपादक अनिलराव कोळसे, शिवाजीनगर व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील विश्वसराव, एकलव्य संघटनेचे जयेश माळी, गिताराम बर्डे, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे कुमार भिंगारे, बांधकाम कामगार संघटनेचे शहर अध्यक्ष विजय कुमावत, पत्रकार खालिद शेख, मिराज शेख आदी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना हेल्प टीम चे अध्यक्ष दत्ता कडू पाटील म्हणाले की, आज हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुखांची जयंती. विनम्र अभिवादन. महाराष्टा्चे समाजकारणात न् राजकारणांत जे काही निवडक व्यक्तीमत्वे आपला ठसा कायम ठेवुन गेले.ज्यांचे उल्लेखाशिवाय राजकारण न् समाजकारण अधुरे ठरते.अश्या निवडक व्यक्तीमत्वात वंदनीय मा शिवसेनाप्रमुखांचा क्रमांक खुप वरचा लागतो.जेंव्हा प्रस्थापित राजकारण्यांची पकड मजबुत असताना नाही रे घटकांला आपले मुलभुत हक्कांसाठी पेटवुन उठवत बळ देण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले.राजकारणाचे व समाजकारणाचे कक्षेच्या बाहेर असलेल्या बहुजन अठरापगड जातींच्या सर्वसामान्य माणसांला मुख्य प्रवाहात आणुन शोषीतांपासुन शासीत बनवले. सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी मुंबईतुन सुरु झालेली लढाई थेट दिल्ली दख्तांला जावुन धडकली.प्रादेशिक अस्मिता जपत अखंड तसेच प्रखर राष्टी्यत्व जपत त्यांनी तेजस्वी आक्रमक तसेच समाजाप्रती संवेदनशील शिवसैनिकांची मजबुत फळी निर्माण केली.आजहि त्याच पुण्याईवर तसेच विचारांरावर शिवसेना पक्षाचा मुळ ढाचा कायम टिकवुन आहे.कालपरत्वे शिवसेनापक्षांची आक्रमकता वा प्रखरता राजकिय भुमीका १००% स्वीकारल्याने काही अंशी कमी झाल्याची टिका राजकिय विरोधक अथवा विश्लेषक करत असतात.परंतु सर्वसामान्य माणुस केंद्रबिंदु मानुन विधायक न् प्रामाणीक राजकारण करण्याचा विश्वास आताच्या नेतृत्वाने जपला आहे.
सत्तेच्या राजकारणांपासुन दुर रहात कोणतेहि राजकिय वा सत्तेचे पद नाकारत सर्वसामान्य शिवसैनीकांस मुख्यमंत्री लोकसभेचे अध्यक्ष, मंत्री , महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष एका अनेक पदे अगदी सहज बहाल केली.८०% टक्के समाजकारण न् २० % राजकारण हे समीकरण तात्कालीक परिस्थितीशी जुळवुन घेण्यासाठी ठीक होते, परंतु काळाचे गरजेनुसार शिवसेना पक्ष पुर्णपणे राजकिय भुमीका घेत १००% राजकारण न् १००% समाजकारण या नव्या तत्वावर काम करु लागला.आज ठाकरे घराणे राज्याचे सत्तेत सहभागी आहे.कोणताही अनुभव नसताना केवळ प्रामाणीक न् पारदर्शक व विश्वासु राजकारण करत आपले प्रशाकिय कौशल्य त्यांनी दाखवुन दिले आहे. नव्या राजकिय समीकरणांत अनेक फायदतोटे होत असतीलहि. परंतु मागच्या पंचवार्षीकला तसेच यंदाहि अत्यंत संयमी तसेच रोखठोक भुमीका घेत भाजपांचा पुर्ण सत्ता काबीज करण्याचा डाव महाराष्ट्रापुरता तरी थोपवण्यात ते यशस्वी झाले.२५ वर्षात घट्ट असलेली युती तोडुन नवी समीकरणे मांडुन दोन वर्ष उलटुन गेली तरी कठीण संकटे असताना आश्वासक नेतृत्व मा शिवसेना पक्षप्रमुखांनी महाराष्ट्रास दिले आहे. देशात पहिल्या ५ मध्ये त्यांचा क्रमांक त्याचेच द्योतक आहे.अंत्यत आक्रमक,धुर्त कॅाग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना व्यवस्थित सांभाळत पुर्ण स्वायतता देत राज्यकारभार यशस्वी चालवला आहे.नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना कुणी क्रमांक ३ ला तर कुणी ४ नंबरवर राहिली म्हणतात.परंतु हि आकडेवारी गतवेळेपेक्षा खुप जास्त आहे.हे समोर आले आहे.कुणी काही म्हणो मा शिवसेनाप्रमुखांचे विचारावर अढळ श्रध्दा असलेल्या शिवसेनाप्रेमी जनतेच्या मनात आजहि तोच आदर शिवसेना पक्षास आहे.भविष्यांत देशाचे राजकारणांत महत्वाची भुमीका शिवसेना बजावणार यात शंका नाही. जय महाराष्ट्र असे माजी सनदी अधिकारी तथा देवळाली हेल्प टीम चे अध्यक्ष दत्ता कडू पाटील यांनी महंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!