ताज्या घडामोडी

तणावमुक्तीसाठी नेहमी सकारात्मक विचार करा : सोपान शेडगे

Spread the love

कोकरुड/वार्ताहर

तणावमुक्तीसाठी नेहमी सकारात्मक विचार करावा असे प्रतिपादन मुंबईचे प्रसिद्ध व्याख्याते सोपान शेडगे यांनी केले.ते तुरुकवाडी ता.शाहुवाडी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी सरपंच गणपती कांबळे, दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ बाळासाहेब पाटील, प्रशासकीय अधिकारी जे. एस. पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना शेडगे पुढे म्हणाले की, यशस्वी होण्यासाठी कामाच्या वेळेचे नियोजन करा. नकारात्मक विचार न करता नेहमी सकारात्मक विचार करा. वाद विवादाच्या प्रसंगी नमते घ्या, माफी मागायला, माफ करायला शिका. एकमेकांच्या भावनांना जपा, भावना दुखावणारे शब्दप्रयोग एकमेकांमध्ये संवाद साधताना टाळा. तणावाच्या वेळी जवळचे मित्र यांचेशी चर्चा करा. नियमितपणे शारीरिक व्यायाम, योगा करा.तसेच आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्य जपण्याकडे लक्ष्य द्यावे.यावेळी दैनिक पुण्यनगरी पत्रकार प्रतापराव शिंदे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास दत्तसेवा पतपेढीचे विभागीय अधिकारी लक्ष्मण पाटील, शाखाधिकारी अशोक पाटील, जितेंद्र साळवी, सुनिल कुंभार,मुख्याध्यापक गणेश पाटील, मुख्याध्यापिका लता हारुगडे, लिपिक ज्योती साळवी आदींसह सर्व शिक्षक स्टाफ, पतसंस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!