ताज्या घडामोडी

संपादक श्री विलास देवळेकर “राष्ट्रीय साहित्य साधना” पुरस्काराने सन्मानित !!

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

नवी मुंबई:- १० जून २०२२ रोजी साहित्य मंदिर हाॅल वाशी, येथे “साहित्य गौरव महा-उत्सव राष्ट्रीय साहित्य सन्मान” सोहळा संपन्न झाला. सदर सोहळ्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून १०० हून अधिक साहित्यिक, कवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला, छत्रपती शिक्षण मंडळ संचालित नुतन ज्ञान मंदिर कल्याण (पूर्व) शाळेच्या लहान विद्यार्थ्यांनी बडबड गीते- पोवाडा- कविता- कथा वाचन करुन, कार्यक्रमाची खुप छान सुरुवात झाली. साहित्य मंचावरील पाहुण्यांचे स्वागत झाल्यावर, कविता- लेख- भारुड अशा अनेक साहित्य प्रकारानी युक्त “रंग तरंग साहित्याचे” ह्या ई- बुकचे प्रकाशन ज्येष्ठ शिक्षण तंज्ञ/ साहित्यिक डॉ लक्ष्मण शिवणेकर यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले. पद्मश्री नयना आपटे, साहित्यिक स्वप्निल राणी नंदकुमार, साहित्यिक राजन खान, माहिती संचालक महा राज्य श्री देवेंद्र भुजबळ, उद्योजक श्री प्रकाश गायकवाड, अभिनेत्री पुजा काळे, आणि इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन च्या प्रकाशक श्रीमती सलमा खान यांची या प्रकाशन एवं सन्मान सोहळ्यास विशेष उपस्थिती होती. आयकर विभागातील ‘समाजभूषण तथा साहित्यिक’ श्री विलास देवळेकर यांना “राष्ट्रीय साहित्य साधना पुरस्काराने” सन्मानपत्र- स्मृतीचिन्ह तथा त्यांच्या काव्य प्रकाशनासाठी सन्मान पदक देऊन गौरविण्यात आले. साहित्यिक स्वप्निल यांनी श्री विलास देवळेकर यांचे “रंग तरंग साहित्याचे” ह्या ई-बुकाचे ‘संपादक’ म्हणून कौतुक करत, यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे असून, आयकर विभागातील सर्वांचे ज्येष्ठ कवी म्हणून त्यांच्या नात्याचा यावेळी विशेष गौरव केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, शंभरहून अधिक साहित्यिक याप्रसंगी विशेष उपस्थित होते.आयोजक आणि संयोजक श्री एन. डी. खान यांनी उत्तम नियोजन केले होते. आणि त्यांचे कौतुक ही सर्वांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!