आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज मंदिर भाविकांसाठी दोन दिवस बंद.                        

श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील देहूनगरीत शिळा मंदिराचे        लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला येणार .

Spread the love
  1. नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज मंदिर भाविकांसाठी दोन दिवस बंद                                     आवाज न्यूज: देहु श्री संत तुकाराम महाराजांच्या लोकार्पण  सोहळ्यासाठी  मंगळवारी  पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या द्रुष्टिने 12 जून सकाळी 8 वाजल्यापासून 14 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील देहूनगरीत शिळा मंदिराचे        लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला येणार आहे.
या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आवार, शिळा मंदिर, सभास्थानी तयारी सुरु आहे. दुपारी एक ते दोन या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार असून मंदिरातील सोहळा आणि वारीच्या अनुषंगाने वारकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे, सूत्रांनी सांगितले.

आषाढी वारी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देहूनगरी मध्ये चैतन्याचे वातावरण आहे. श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज देवस्थानच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ असलेल्या शिळा मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. देवस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या वतीने तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून  नियोजनानुसार दुपारी एक ते दोन या वेळेत पंतप्रधान देहूनगरीत येणार आहेत. नंतर इंद्रायणीतीरावरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारकऱ्यांच्या वेशात पंतप्रधान येतील.

विठूरायाचे दर्शन घेऊन शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येईल. त्याचवेळी देवस्थानच्या वतीने तुकोबांची पगडी आणि जउपरणे देऊन पंतप्रधानांचे स्वागत होईल.यावेळी मंदिरात निवडक वारकरी, सेवेकरी  उपस्थित असणार आहेत.या कार्यक्रमासाठी मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरील माळवाडी हद्दीत 22 एकर जागेत बंदिस्त सभागृह तयार केले आहे.

त्याठिकाणी 40 हजार वारकरी बसतील एवढी क्षमता आहे. तिथे पंतप्रधानांचे आगमन झाल्यानंतर देवस्थानच्या वतीने सत्कार केला जाईल. यानंतर अध्यक्षांचे मनोगत आणि त्यानंतर पंतप्रधानांचे भाषण होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!