क्रीडा व मनोरंजन

२४ एप्रिलला पुरुष-महिला व २१ वर्षाखालील मुला-मुलींची इनडोअर क्रिकेट मैदानी निवड चाचणी दादर मध्ये

Spread the love

मुंबई, १९ एप्रिल, (क्री. प्र.): जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (WICF) ८ ते १५ ऑक्टो. २०२२ या कलावधीत इनडोर क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियात आयोजित करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनने (IISF) भारतीय संघाची बांधणी करण्यासाठी राष्ट्रीय निवड स्पर्धा मे अखेरीस बेंगळुरू येथे आयोजित केली आहे. यासाठी महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्रात मैदानी निवड चाचणी घेण्याचे जाहीर केले आहे.सदर निवड चाचणी २४ एप्रिल रोजी पुरुष-महिला (खुला गट) व २१ वर्षाखालील (१६ ओक्टोंबर २००० नंतर जन्मलेले) मुला-मुलींसाठी आयोजित केली जाणार असून या निवड चाचणी मधून महाराष्ट्राचा प्राथमिक संघ निवडला जाणार आहे. ही निवड चाचणी अर्बन स्पोर्ट्स सेंटर, (अँटोनीया डिसील्वा टेक्निकल हाय.), स्वा. सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर, मुंबई ४०००२८ येथे आयोजित केली आहे.

या निवड चाचणी साठी केंद्रावर सकाळी ७:३० वा. महिला व २१ वर्षाखालील मुली यांच्यासाठी नोंदणी सुरू होणार आहे तर दुपारी ३:३० वा. पुरुष व २१ वर्षाखालील मुलांची नोंदणी केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी व निवड चाचणीत सहभाग नोंदवण्यासाठी बाळ तोरसकर– महासचिव यांच्याशी ९८६९१ ३५०८३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आव्हान असोसिएशन तर्फे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!