ताज्या घडामोडी

: सोमा सिसाळ यांना यशव़ंत क्रांती संघटनेच्या प्रयन्नामुळे मिळाली ९२५०/-रुपये नुकसान भरपाई

Spread the love

टोप येथील मेंढपाळ सोमा आणाप्पा सिसाळ मु.पो.टोप ता.हातकणंगले जि.कोल्हापूर यांचा मेंढरांचा कळप श्री.सर्जेराव लक्ष्मण सिसाळ यांच्या टोप गावातील वेताळाचे माळ येथील (गट नं.१३०२ )येथील शेतात खतासाठी बसायला असताना. दि.११/६/२०२१ रोजी लांडग्यांनी कळपावर हल्ला केला या हल्ल्यात सोमा सिसाळ यांची पाच बकरी जाग्यावरच ठार केली होती.सदर हल्याची बातमी मेंढपाळ यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संजय वाघमोडे,व यशवंत क्रांती संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष दादासो गावडे यांना कळविली होती.मा.श्री.संजय वाघमोडे यांनी तात्काळ .वन विभाग व पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली व रीतसर नुकसान भरपाई साठी घटनेचा रितसर पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळणेबाबत सतत पाठपुरावा केला. केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन वनविभागाकडुन सोमा सिसाळ यांना ९२५०/-रुपये नुकसान भरपाई पोटी देण्यात आले.यावेळी बोलताना संजय वाघमोडे म्हणाले कि कोल्हापूर जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत आहेत.यामुळे मेंढपाळ यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई खुपच कमी मिळते. सध्या वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तरी मेंढपाळ यांनी आपली व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. नुकसान भरपाई मिळण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. संजय वाघमोडे साहेब व यशव़ंत क्रांती संघटनेचे,पशुसंवर्धन आधिकारी डॉ. अहमद मुल्ला, सात्ताप्पा जाधव वनपाल नरंदे, दिलीप आप्पा खंदारे वनरक्षक नरंदे, याचे आम्ही मनापासून आभार मानतो मी सर्व मेंढपाळ तसेच धनगर समाजाला विनंती करतो कि यशवंत क्रांती संघटना आपल्यासाठी काम करत आहे.आजपर्यंत आम्हाला अशी नुकसान भरपाई मिळते हे माहिती सुध्दा नव्हते ते संजय वाघमोडे साहेब यांच्या मुळे समजले आणि त्याचा आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. तरी त्याचे पुन्हा एकदा आभार आपण सर्वानी यशव़ंत क्रांती संघटनेत सहभागी होऊन संघटना बळकट करुया. असे अनिल सिसाळ यांनी सांगितले. दादासो गावडे श्रावण गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी , यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, यशवंत क्रांती हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे यशवंत क्रांती संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष दादासो गावडे,जिल्हा संघटक श्रावण गावडे,युवा नेते सचिन नांगरे, श्री.अमोल सिसाळ अनिल सिसाळ,यशवंत क्रांती संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी व मेंढपाळ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!