आरोग्य व शिक्षण

भारती हॉस्पिटलमध्ये स्लीप लॅब (निद्रानाश तपासणी केंद्र) चे उदघाटन

Spread the love

श्रीमती विजयमाला पतंगराव कदम, अध्यक्षा शालेय शिक्षण समिती , भारती विद्यापीठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन.एस. मनी, भारती हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी हे मान्यवर उपस्थित होते.

मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासाठी झोप ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. परंतु काही कारणाने झोपेची ही देणगी हिरावली जाते. त्यामुळे अशा व्यक्तींना मानसिक समस्यांबरोबरच अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. पण या समस्येबाबत / आजाराबाबत समाजात जागरूकता नसल्याने निदान होण्यास खूप वेळा उशीर होतो. झोपेच्या या आजारांचे निदान करणे या स्लीप लॅबमुळे शक्य होणार आहे. यासाठी रुपये 30 लक्ष गुंतवणूक करण्यात आली आहे. साऊंड प्रूफ रुममध्ये अत्याधुनिक मशिनरी लावण्यात आली आहे.

*या आजाराची सामान्य लक्षणे काय आहेत?*
झोपेत घोरणे , अचानक धाप लागून जाग येणे, शांत झोप न लागणे, दिवसभर थकवा जाणवणे, दिवसभर झोपाळलेले वाटणे, निरुत्साही वाटणे.

याबरोबरच नीट झोप न झाल्याने मधुमेह व रक्तदाब उपचार करूनही आटोक्यात रहात नाहीत.रूग्णाला दैनंदिन काम करणे अवघड होते.
एकाग्रता कमी होते.निद्रानाश किंवा झोपेत व्यत्यय-कारणे मेंदूचे आजार , जास्त वजन, थाॅयराईड ग्रंथीचे आजार, ह्यामुळे लहान श्वसनमार्ग/छोटी मान व श्वसनप्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.

*स्लीप स्टडी कशा प्रकारे केला जातो.*

रूग्णाला तपासणीसाठी रूग्णालयात दाखल करून विविध सेन्सर्स, कॅमेरा याव्दारे रात्री झोपेत शरीरातील ऑक्सिजन पातळी, श्वसन, शरीराची हालचाल, मेंदूचे कार्य ह्यावर बारकाईने नजर ठेवली जाते व त्या मिळणाऱ्या नोंदीतून तज्ञ डॉक्टर निष्कर्ष काढतात व पुढील उपचाराची दिशा ठरवली जाते.

अशा प्रकारची सुविधा सगळीकडे उपलब्ध नसते कारण अशी लॅब उभारण्यासाठी मोठा खर्च येतो, समाजात अज्ञान असल्याने असा स्टडी केला जात नाही. याचे महत्व प्रत्येक रुग्णास पटवून द्यावे लागते.
यासाठी आवश्यक स्कील असणाऱ्या टेक्निकल स्टाफ व तज्ञांची वानवा. भारती हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्याने पुण्यातील व आसपासच्या अनेक रुग्णांना फायदा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!