ताज्या घडामोडी

विकासाची घौडदौड यापुढेही सुरुच राहणार : विनय कोरे

Spread the love

कोल्हापूर : (वर्षाराणी दुर्गे सरूडकर) :
पुसार्ळे पैकी धनगरवाडा ता. शाहूवाडी येथे सांस्कृतिक हॉल बांधण्यासाठी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या आमदार फंडातून ५ लाख रु. मंजूर केले. यावेळी ते बोलत होते. शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत, यापुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन लोककल्याणाची कामे अधिक सक्षमपणे करून शाहूवाडी तालुक्याची विकासाची घौडदौड यापुढेही सुरूच राहणार असे आमदार डॉ. विनय कोरे यांनी यावेळी सांगितले.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व शाहूवाडी – पन्हाळ्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील – पेरीडकर, पांडुरंग पाटील – पैलवान, आर. एस. पाटील, गंगाराम झोरे यांचा प्रमुख उपस्थितीत दगडू वरक, नवलू झोरे, विठ्ठल वरक, टक्कू झोरे, बंजरग झोरे, बाबुराव शेळके यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!