क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

जैन इंग्लिश स्कूल येथे ग्रँड पेरेंट्स डे अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न.

Spread the love

जैन इंग्लिश स्कूल येथे ग्रँड पेरेंट्स डे अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न.Grand Parents’ Day at Jain English School concluded in a very festive atmosphere.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २० ऑक्टोबर.

रौप्य महोत्सवानिमित्त जैन इंग्लिश स्कूल येथे आजी आजोबांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी “चिरतरुण दीपस्तंभ ” विषयाच्या माध्यमातून आपल्या आजी-आजोबांविषयीच्या भावना व्यक्त करत असताना सर्व श्रोत्यांची मने जिंकली. वयानुरूप अनेक दाखले देत सर्व आजी आजोबांचा आनंद द्विगुणित केला. तसेच मुळाक्षरांची ओळख निर्माण करताना अक्षरांची मूळ जीवनापर्यंत* नेणारी शाळा म्हणजे जैन इंग्लिश स्कूल असे कौतुक देखील याप्रसंगी केले.

हा फक्त ग्रँड पेरेंट्स डे नसून संस्कार व कृतज्ञतेचे नाती जपण्याचे आदराचे कौतुकास्पद संमेलन आहे असे प्रतिपादन याप्रसंगी प्रमुख अतिथींनी केले .

वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन याप्रसंगी प्रमुख अतिथींनी सर्व श्रोत्यांना केले.संस्थेचे चेअरमन माननीय प्रकाश ओसवाल यांनी प्रास्ताविकातून आजी आजोबांना शुभेच्छा देऊन स्वागत केलेविद्यार्थ्यांचे स्वागत गीत, आणि आजी आजोबांच्या जीवनाशी निगडित असलेल्या प्रसंगातून नृत्य सादरीकरण करणारे विद्यार्थी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कुमारी अनन्या उदय भेगडे हिच्या भावनांमधून आजी नातवंडांचा संवाद अलगदपणे उलगडत गेला याप्रसंगी सर्व आजी आजोबा अगदी भारावून गेले होते.
ग्रँड पेरेंट्स डे च्या निमित्ताने अनेक मनोरंजनाचे खेळ आजी-आजोबांसाठी घेण्यात आले खेळात विजयी ठरलेल्या आजी आजोबांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या खेळांचा आजी आजोबांनी अतिशय मनमुराद आनंद लुटला.
याप्रसंगी भाग्यवान आजी आजोबांसाठी लकी ड्रॉ च्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या वेळी आजी-आजोबांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व आजी आजोबांच्या चेहऱ्यावर बालपणात, तारुण्यात रममाण झाल्याचा भाव दिसून आला.

 

कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी मुख्याध्यापिका. विजया शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य आजी आजोबा,संस्थेचे संचालक सदस्य दिलीप पारेख, दिलीप वाडेकर, दिनेश शहा ,अजय शहा, किरण परळीकर, राकेश ओसवाल आदी मान्यवर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका शुभांगी भोईर सौ अपूर्वा टकले उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. अनघा कुलकर्णी,  आरती पेंडभाजे तर आभार प्रदर्शनाचे कार्य दिलीप पारेख यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!