ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमावळ

मावळमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार ठरला..

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे. मावळ लोकसभेकडून महायुती विरोधात ठाकरेंनी संजोग वाघेरेंना उतरवलं आहे.

Spread the love

मावळ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे. यात राज्यभरातील 17 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

मावळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मात्र महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. मावळमध्ये धनुष्यबाण चिन्हाला मत द्या, असं आवाहन काल (26 मार्च) अजित पवारांनी पत्रकार परिषदेत केलं मात्र उमेदवाराचं नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. येत्या 28 मार्चला महायुतीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे. असं असलं तरीही श्रीरंग बारणे यांना मायुतीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मावळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना अशी तगडी लढत पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!