क्राईम न्युज

पिंपरीत टोळक्याकडून कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले

एकाला केली अटक

Spread the love

पिंपरी-चिंचवड शहरात कोयता गँगने कार चालकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याला लुटण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (दि.25) बोपखेल येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

आकाश  गिरीगोसावी (वय 30 बोपखेल) असे अटक आरोपीचे नाव असून त्यासह सोन्या तांबे, विकी पिल्ले, शुभम अहिरराव, अजय पिल्ले व इतर चार ते पाच जण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अभिजीत ओमप्रकाश अगरवाल (वय 35 बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कार बोपखेल येथील शितळादेवी मंदिराजवळ पार्क केलेली होती. यावेळी आरोपी आले व त्यांनी हातातील कोयते दाखवून फिर्यादीला मी इथला भाई आहे म्हणत दटावण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी फिर्यादी कडील 560 रुपये रोख काढून घेत त्यांच्या कारच्या काचा कोयत्याने फोडून 10 हजार रुपयांचे नुकसान केले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!