आपला जिल्हा

मोबाईलवर गप्पा मारण्यात दंग असलेल्या परिचारिकेने रुग्णांना दिले चुकीच्या गटाचे रक्त; दोघे अत्यवस्थ.

Spread the love

पिंपरी : औंध जिल्हा रुग्णालयात परिचारकांच्या निष्काळजीपणामुळे दोन रुग्णांची मृत्यूशी झुंज चालू आहे. त्यांच्या रक्तगटापेक्षा वेगळ्या रक्तगटाचे रक्त देण्यात आले असल्याने या दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार चालू आहेत. रक्त देताना परिचारिका मोबाईलवर गप्पा मारण्यात दंग असल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला असून या प्रकरणी भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांनी लक्ष घातल्यानंतर रुग्णालय प्रशासन जागे झाले असून संबंधित परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे.

औंध इंदिरा कॉलनीतील रहिवासी दत्तू सोनाजी सोनवणे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाकड येथील दगडू कांबळे यांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रक्त देण्याचा निर्णय घेतला. सोनवणे यांचा रक्तगट बी पॉझिटीव्ह आहे. तर कांबळे यांचा रक्तगट ए पॉझिटीव्ह आहे.

त्यांना रक्त देताना मोबाईलवर गप्पा मारण्यात दंग असलेल्या परिचारिकेने सोनवणे यांना ए पॉझिटीव्ह तर कांबळे यांना बी पॉझिटीव्ह रक्त दिले. त्यामुळे या दोघांची तब्येत गंभीर बनली.त्याना आयसीयूमध्ये हलविण्यात आले.

ही माहिती कळल्यावर आमदार अश्विनी जगताप यांनी रुग्णालय प्रशासनाला फैलावर घेतले त्यानंतर त्या परिचारिकेला निलंबित करून घटनेची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यल्लमपल्ली यांनी दिली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!